"भावा, ते किंटन लई बेरकी...तुला सांगतो...' असं करत गजानं तोंड उघडलं, की भली भली, चकचकी गॉसिप्स् मॅगेझिन्स झक मारावीत, असे मसालेदार किस्से सुरू व्हायचे..."येकदा ती मोन्का, अशी हुबी होती...' असं करत गजा जणू व्हाईट हाऊसच्या ऍन्टी चेंबरमध्ये घुसून सारं पाहून आल्यासारखा गुऱ्हाळ सुरू करणार. क्लिंटनपासून सुरू झालेलं गजाचं पुराण कुठंही अनिर्बंध संचारणार. मग, त्यात सचिनची बायको त्याच्यापेक्षा नेमकी किती वर्षांनी मोठी, त्याचे फायदे काय-तोटे काय, शाहू स्टेडियममधल्या फुटबॉल मॅचमध्ये कसं फिक्सिंग झालं, नगरसेवकानं गटारीच्या कामात किती पैसे खाल्ले...असे एक ना अनेक किस्से गजाच्या पोतडीतून निघत राहणार आणि घरातून "संपला की नाही तुमचा कट्टा ?' अशी तिरसट हाक आली, की साऱ्यांना हळू हळू भान येणार...!
आमचा कट्टा म्हणजे आमचं सारं काही. अगदी गळ्याशप्पथ. "इस घर की हर ईंट मैने अपने खून-पसिनेंसे लगायी है...' हा डायलॉग आमचं आणि कट्ट्याचं नातं सांगण्यासाठीच बहुधा लिहिला गेला. खरंच, आम्ही कट्ट्यासाठी खून-पसिना एक केला. म्हणजे काय झालं, की गल्लीच्या कॉर्नरला आम्ही सगळे नेहमीच उभे असायचो. येणाऱ्या-जाणाऱ्यांकडं गरजेनुसार पाहात असायचो. पण, तास-दोन तासांनी पाय दुखायचे. मग, तिथंच रस्त्याकडेला बसायचो. बरीच वर्ष अशी-तशीच गेली. साताठ वर्षांमागं, कधीतरी अचानक सुचलं, की इथंच बसायची सोय केली तर काय जातंय ? "विचार आणि कृती, त्यातील अंतर' वगैरे गोष्टी त्यावेळी कानावरूनही गेल्या नव्हत्या. त्यामुळं, सुचला विचार, केलं काम. झाला कट्टा...! शेजारच्या गल्ल्या पालथ्या घातल्या. त्यातल्या त्यात दूरची गल्ली पकडली. तिथं सुरू असलेली बांधकामं हेरून ठेवली अन् रात्रीत आमच्या गल्लीचा कॉर्नर कट्ट्यानं सजला...!
बसायची सोय झाली. चांगला फरशीचा कट्टा झाला. हा, चार-दोन ठिकाणी आवई उठली, की पोरं चोरटी आहेत. इथं कट्ट्यावर येऊन तसं म्हणायची कुणाची बिशाद झाली नाही, हे आमच्या कट्ट्याचं यश...! कट्टा बांधला, म्हणून पार्टी केली. स्टेरिओ लावून नाचलो. एरव्ही तास-दोन तास कॉर्नरला वेळ काढणार, ते आता रात्री उशीरापर्यंत बसू लागलो. नाहीतरी अस्थिरता घातकच की. उभे राहून राहून तुम्ही किती वेळ उभे राहणार ? बसायला हवंय. त्याशिवाय स्थिरता येणार ? तर अशी स्थिरता आम्हाला आली. मग गप्पांचे फड मारू लागलो.
मघाशी म्हटलं, तो गजा म्हणजे आमच्या कट्टा शिरोमणींपैकी एक. अशा नवरत्नांची खाण कट्ट्यानं घडवलीय.
घरातल्यांची भुरटी कामं आटोपली, की सकाळचा कट्टा फड जमतो. पेपर वाचला असला, तर कोणीतरी पेपरातला काहीबाही सांगत सुटतो. क्रिकेटची मॅच आदल्या दिवशी झालेली असली, तर सकाळचा फड क्रिकेटवर. पेपरबहाद्दर सुज्या "द्रविडनं ऑफ स्टंपचा बॉल लाईनमध्ये येऊन नीट खेळला पाहिजे' असं कुणाच्या तरी कॉलममधलं वाक्य आमच्या तोंडावर फेकणार. आता आम्हाला एक "लाईन' माहिती ! त्यामुळं आम्ही मान डोलवणार. क्रिकेटचा कंटाळा आला, की "ऍश', "कॅटरिना', शेजारच्या गल्लीतल्या भानगडी. भुकेनं पोटात कलकलायला लागलं, की एक एक जण हळू हळू कट्ट्यावरून घरंगळत घरची वाट धरणार. अडिच-तीनपर्यंत कट्टा पार ओकाबोका. किंवा मग हीच त्याची विश्रांतीची वेळ. "ऍश'चा ताजा विषय डोक्यात ठेवून दुपारची डुलकी काढून पुन्हा कट्टा ताजातवाना. दिवस कलंडण्यापूर्वीच त्याचे सारे वारकरी नेमानं हजर.
संध्याकाळी कुठं फिरायला जायचं असलं, तर तेही ठरणार इथंच. परत किती वाजता याचचं ? रात्रीचा काय "कार्यक्रम'? "ती' घरच्यांबरोबरच फिरायला गेली आहे का, याची खात्री करायला पाहिजे का? असं सगळं प्लॅनिंग इथंच. कट्ट्यावरच असलो तर विषय कोणताही चालणार. घरातल्या बायकांमुळं टीव्ही बघणं अलीकडं कसं अवघड होतंय, यावर साऱ्यांचं एकमत. "सॉंस-बहूँ', "अवंतिका' असली रड आपण कधीच न पाहिल्याचा साऱ्यांना अभिमान. तो प्रत्येकजण दाखवणार.
इथं शाळा-कॉलेजचा विषय फक्त "मापं' घेण्यापुरता किंवा मास्तरची आई-बहिण काढण्यापुरता. तिथल्या इतर गोष्टींची इथं काहीच जरुरी नाही, हे कट्टेकऱ्यांना मनापासून पटलेलं. गजानं दहावीच्या आसपास शाळा सोडलेली. त्याच्याकडची माहिती मात्र आमच्यातल्या "इंजिनर्स'ना लाजवणारी. आणि असे गजा कट्ट्यावर दिवस न रात्र पडून. त्यामुळं शाळा-कॉलेजातल्या उंच उडीचा कट्ट्याशी संबंध शून्य. इथं बसायचं, तर कट्ट्यावर येऊन. उगाच हुशारीच्या शिडावर बसून खालच्यांना हिणवायचं नाही. कोण कधी शिडाला टाचणी लावंल, सांगता येणार नाही.
कट्ट्याला विषयाचं वावडं नाही. इथं सेन्सॉरशीप नाही. जसा विचार, तशी भाषा. मनातलं काही दडवायचं नाही. बोलून टाकायचं, हा कट्ट्याचा खाक्या. त्यामुळं रात्रीची जेवणं उरकून कट्टा रंगला, की बास. गजा सुटला, तर किशाला टॉनिक. किशा झाला, की अरव्या. "माहितीचा अधिकार' कायदा नसतानाही, यांनी असली माहिती कुठून, कशी मिळवली, याचं राहून राहून आश्चर्य वाटणार. कट्टा रंग रंग रंगाणार. डोक्यावरचा सूर्य पाहिलेल्या कट्ट्याला चंद्रही डोक्यावर आलेला पहायला मिळणार. घरातल्यांची हाक एकीकडं आणि गजाचं "तुला सांगतो...'दुसरीकडं, अशा त्रांगडं झालेल्या अवस्थेत कट्ट्याचा प्रत्येक वारकरी झोप आवरत ताटकळणार...
- सम्राट फडणीस
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
Gangaveshitil kattyachi aathavan aali bag.........
O samratbhau, tumcha katta zakasach mhanayacha ki ho!
Abhijit -
Are you collecting the articles written by others on behalf of 'Sakal Papers' or is this just a personal blog where you are posting articles sent by the writers/with the consent of the writers?
gH$mir H$Å>m, Xwnmar H$Å>m, g§Ü`mH$mir H$Å>m...
amÌrMm Va H$Å>mM...H$Å>m.
‘Ü`amÌrnmgyZ..nhmQ>on`ªV H$Å>mM H$Å>m..
AYo-‘Yohr H$Å>mM H$Å>m...
Am`wî` gma§ gmb§ H$Å>m‘` Pmb`§..
Aao ‘amR>r ‘mUgm§Zr H$Q²Q>çmM§ "noQ>§Q>' ¿`m`bm hd§.
ZmhrVa OJmV Hw$R>o Agb§ A’$bmVyZ "Am{H©$Q>oŠMa' ^oQ>ob åhUm...!
Ë`m‘wio ‘amR>r ‘mUgm§Zr EH$Xm H$m `mM§ noQ>§Q> KoVbo H$s,,,
‘J "H$mnm}aoQ> H$Å>o' hmoVrb. "H$Å>o'hr hm`-’$m` hmoVrb. gmo{’$ñQ>rHo$Q>oS> hmoVrb.
‘J Om{hamVtgmR>r, doJdoJù`m "bm±{MJ'gmR>r H$Q²Q>çm§Zm ‘mJUr `oB©b.
Ag§hr H$Q²Q>çmM§ ‘mH}$qQ>J H$aVm `oB©b. H$Q²Q>çm§Mr ‘|~aern R>adVm `oB©b.
Aao ~m~m...hr nU H$Q²Q>çmdarbM§ EH$ Jßnm...`m H$ënZoM§hr "noQ>§Q>' H$aVm `oB©b...
hm` H$m` Zm`, H$moëhmnwar H$Q²Q>çm§dabm EH$ "^oOm'..`m "^oOm'M§hr "noQ>§Q>' H$aVm `oB©b..
hm` H$m Zm` ZmX Iwim...!
-{Z{eH$m§V VmoS>H$a
fool2 Zakas...............
खूप छान लिहिले आहे. मी ही याच विषयावर एक लेख लिहिला आहे. तुम्ही तो येथे वाचू शकता.
http://maalkauns.blogspot.com/2008/12/blog-post_24.html
-अभी
Good dispatch and this fill someone in on helped me alot in my college assignement. Thanks you on your information.
Post a Comment