Saturday, November 3, 2007

मराठी वाहिन्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्या

महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं। मराठी वाहिन्यांवर यातलं फार थोडं दिसतं. कारण कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेचा अभाव आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाच चेहरामोहरा बदलून जायला वेळ लागणार नाही.

मराठी वाहिन्यांनी एकंदरीतच वेगळं काहीतरी असं हिंदी वाहिन्यांसारखं नसलेलं दाखवलं पाहिजे, असं आपल्याला वाटतं। बहुतेक वेळा आपली ही इच्छा फलद्रुप होताना दिसत नाही. हिंदी वाहिन्यांची सर्वांत मोठी समस्या ही, की त्या अतिशय भडक, मेलोड्रामॅटिक असतात- मग ती वाहिनी मनोरंजनवाहिनी असो की वृत्तवाहिनी असो- भडक आणि मेलोड्रामॅटिक होत जाते. उत्तरेच्या संस्कृतीचा हा मोठाच दोष आहे. महाराष्ट्रात हा दोष फार कमी आहे. नेत्यांच्या नावामागे अलीकडे "जी' लावण्याची टूम आलेली आहे, ती वगळता अर्थात!

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाची जगण्याची पद्धत, रसास्वाद घेण्याची पद्धत, कलेची आवड, छंद वगैरे सर्वकाही उर्वरित भारताहून वेगळं आहे। त्याचं प्रतिबिंब खरंतर मराठी वाहिन्यांतील कार्यक्रमात पडणं अभिप्रेत आहे; परंतु, सर्वसाधारणपणे सत्तर टक्के वेळा ते प्रतिबिंब या कार्यक्रमात पडतच नाही. अपवादात्मक मालिका सोडल्यास मराठी मालिकांना मराठी म्हणावं लागतं याचं कारण त्यातल्या पात्रांची आडनावं मराठी असतात! एक साधी परीक्षा या मालिकांच्या बाबतीत करून बघितली असता, त्यातला उथळपणा बाहेर येतो. तो म्हणजे मराठीतल्या बहुतेक मालिका इतर कुठल्याही भाषेत डब करून आडनावं बदलली तर ती मालिका तिथली होते. याचं कारण त्यातला उथळपणा भाषा, प्रांत, संस्कृतीच्या तळाशी जे असतं, ते ढवळून काढणाऱ्या कथा आणि कथानकं न वापरल्यानं निर्माण होत असतो. एक मालिका जेव्हा बनते, तेव्हा ती कितीही भिकार किंवा टाकाऊ असली, तरी काहीतरी स्टेटमेंट करत असते. त्या स्टेटमेंटची जबाबदारी त्या संबंधित वाहिनीची असते. जबाबदारी असते याचा अर्थ कोणत्यातरी कोर्टापुढे त्याची लगेच सुनावणी व्हायला हवी आहे, असा नव्हे; तर महाराष्ट्रासारख्या मराठी भाषक प्रदेशाच्या सांस्कृतिक आकांक्षा कळल्या आहेत वा कळल्या नाहीत, असा त्याचा अर्थ आहे.

वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत वा मनोरंजन वाहिन्यांवरील बातम्यांबाबतही हेच खरं आहे. बऱ्याचदा मराठीतल्या बातम्या या हिंदीतल्या मालिका, "रिऍलिटी शो'ज आणि त्यातील कारागिरांची आयुष्यं यांवरच असतात. ते पाहूनही बऱ्याचदा थक्क व्हायला होतं. महाराष्ट्रात इतकं कमी दाखवण्यासारखं आहे का? की चोवीस तास (खरे तर बाराच) जास्त वाटावेत? मुळात मनोरंजन वाहिनी असो किंवा वृत्तवाहिनी असो, तिचा म्हणून एक मानवी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होणं आवश्‍यक असतं. इंग्रजीतली डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिक, बी.बी.सी. सारखी वाहिनी असो किंवा अगदी "फ्रेंडस्‌'सारखी असो, एक प्रकारची खोली, गांभीर्य आणि डौल या साऱ्यांमध्ये दिसतो. तो डौल वाहिनीचा मानवी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या अनुषंगानं त्या वाहिनीवर विकसित केलेल्या कार्यक्रमामुळे असतो. हे सर्व होण्याकरता ज्या भाषेतून आणि ज्या प्रदेशातून हे सारं घडतं, त्या ठिकाणच्या सांस्कृतिक वारशाची खोली त्या वाहिनीला पकडता यायलाच हवी. मराठीत हेच नेमकं फार फार अपवादानं दिसतं.
या साऱ्याचा अजून एक आनुषंगिक परिणाम मराठीत दिसतो, तो म्हणजे फॉर्मचा। ही समस्या वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तविषयक कार्यक्रम करणाऱ्या वाहिन्यांमध्ये मोठीच दिसते. वापरण्याजोगे असंख्य आकृतिबंध आहेत. मराठीत ते अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे वापरले गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते बुवा-बाबांच्या भक्तीपर्यंत अनेक अंगांनी संस्कृतीला भिडता येतं. त्यासाठी डॉक्‍युमेंट्रीपासून ते डॉक्‍यूड्रामापर्यंत अनेक आकृतिबंध (फॉर्म) उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळेला माईकचं बोंडुकलं हातात धरून अपरिपक्व कुणीतरी कुणाच्या तरी मागे धावलंच पाहिजे, असं नाही. याबाबत राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या हिंदी चॅनेलचं बरोबर आणि अनुकरण करावं असंच असतं, असं नाही. मराठी संस्कृतीला चारही अंगांनी भिडण्याचा आत्मविश्‍वास या बाबतीत मराठी वाहिन्यांमध्ये कमी दिसतो, हेच खरं.

यावर अनेक जण असंही म्हणू शकतात, की अमकातमका कार्यक्रम किंवा अमकीतमकी मराठी वाहिनी महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतातच की! यात मुद्दा असा आहे, की त्याहून वेगवेगळं आणि अभिजात देऊन हा मुद्दा सिद्ध झालेलाच नाही। अजून आहे त्याच उष्ट्या- खरकट्यातली ही स्पर्धा आहे. त्यावरचीच ही युक्तिवादांची कुरघोडी. एकीकडे एडवर्ड डी बोनो वगैरे विचारवंतांची नावं मीटिंगमध्ये तोंडावर फेकायची आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलण्याची वेळ आली, की भांडी फेकून मारण्याची स्पर्धा दाखवायची, असला दारुण मामला आहे हा! यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा- तो म्हणजे, कोणतंही माध्यम म्हणजे त्या माध्यमात वापरलं जाणारं तंत्रज्ञान नव्हे. तंत्रज्ञान हे फक्त मूल्यवृद्धी करतं. एक व्यक्त करण्याचं व्यासपीठ देतं. "सामना' हा मराठी चित्रपट अत्यंत प्राथमिक दर्जाच्या तंत्रानं बनविलेला आहे. त्याच काळाच्या आसपास आलेला "द बर्निंग ट्रेन' हा हिंदी चित्रपट उत्तम तंत्रज्ञानयुक्त होता. "सामना' हा चित्रपट एळिल बनून गेलेला आहे. तीच गोष्ट "पाथेर पांचाली'ची. त्या त्या संस्कृतीत रुजलेल्या मानवी मूल्यांना किती खोलवर भिडता येतं, त्यावर कार्यक्रमांचा आणि वाहिनीचा दर्जा ठरत असतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि पॅकेजिंग हे त्यात मूल्यवृद्धी करते, हे अगदी निःसंशय; परंतु दर्जाचा गाभा मात्र तो नसतो, हेसुद्धा तेवढंच नक्की.

मराठी वाहिन्यांबाबतची अजून एक समस्या म्हणजे मनोरंजनपर मालिका या बहुतांशी घरातच घडणाऱ्या असतात। घरात म्हणजे घरात आणि कार्यालयात किंवा तत्सम ठिकाणी। त्यात घडणारे प्रसंग हे बऱ्याचदा ""हे सर्व येतं कुठून?'' असं वाटायला लावणारे असतात. हिंदीतल्या भंपक मालिकांची बऱ्याचदा इंप्रोव्हाइज केलेली ती तेवढीच भंपक नक्कल असते. फार पूर्वी श्‍याम बेनेगलांची एक मालिका दूरदर्शनवर आली होती. तिचं नाव होतं, "यात्रा.' ती एका ट्रेनच्या देशभरच्या सफरीवरची मालिका होती. महाराष्ट्रात आज माणसं शेती करतात, कारखान्यात जातात, इमारती बांधतात, धरणं बांधतात, हॉस्पिटल्स चालवतात, गाई-म्हशीचं दूध काढतात, साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवतात, तांड्याने फिरतात, ऊसतोड करायला गाडी-कोयता घेऊन स्थलांतरित होतात. मराठी मालिका बघताना वाटावं, की सर्व महाराष्ट्र मुंबई-पुण्यात चौकोनी बांधकामांमध्ये टेबल-खुर्ची व ड्रेसिंग टेबलभोवती एकवटलेला आहे! महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं. एवढंच नव्हे, तर त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत थक्क करणारी आहेच; पण त्याच वेळेला हतबल करणारीसुद्धा आहे. मनोरंजनासाठीच्या आणि वृत्तपटांसाठीच्या कथानकांसाठीही कित्येक पिढ्या पुरेल इतकी सामग्री आहे. मराठी वाहिन्यांवर यातलं फार फार थोडं दिसतं.


लेखक जेव्हा कागद-पेन घेऊन लिहितो, तेव्हा तो कागदासाठी थोडंच लिहितो? तो तर वाचकांसाठी लिहितो। तर मग वाहिन्या आणि त्यावरचे कार्यक्रम टी.आर.पी.साठी (ट्रेड रेटिंग पॉइट्‌स) कसे बनवले जातील? ते माणसांसाठीच बनवायला हवेत. या इथल्या मराठी माणसांसाठीचे कार्यक्रम बनले, तर ते तो पाहीलच, पण असा आत्मविश्‍वास नसणारे "कारकून' आधीच ट्रेड रेटिंग पॉईंट्‌स'ची लोढणी प्रतिभावंतांच्या गळ्यात अडकवत जातात. प्रश्‍न पैशाचा असतो, हे कधी कधी खरंही असतं. पण इथं प्रश्‍न (निव्वळ) पैशाच्या अभावाचा नाहीच. मुख्यत्वेकरून तो कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेच्या अभावाचा आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाच चेहरामोहरा बदलून जायला वेळ लागणार नाही. शेवटी प्रत्येक क्रांतीची एक वेळ असते. ती आता आलेली आहे!

-- राजू परुळेकर
rajuparulekar@hotmail.com

Sunday, October 21, 2007

माSSSज!!

माझ्या कोणत्याही वक्तव्यावर अथवा वर्तनावर माझ्या मित्रांची ही ठरलेली प्रतिक्रीया असते. किंबहुना त्यांना आता इतकी सवय झाली आहे की मला शिंकं आली तरी "माSSSज!!" असं ओरडायला ते मागे पुढे पाहत नाहीत. मी काही बोललो तर त्यात माज असतो, मी काही नाही बोललो तरी तो माजच असतो. थोडक्यात अभिषेकीबुवांच्या "काटा रुते कुणाला" या गाण्यातल्या "माझे अबोलणेही विपरीत होत आहे" या वाक्यासारखी माझी अवस्था झाली आहे.

"खाउन माजा पण टाकुन माजू नका" या म्हणीमधल्या पहिल्या प्रकारात मी मोडतो असंही काही आचरट लोकांचं म्हणणं आहे. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

यावरुन मला असं लक्षात येतं की जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना माज असतो आणि दुसरे ज्यांना माज म्हणजे काय ते कळत नाही. स्वतःला माज असल्याशिवाय माज म्हणजे काय हे पण कळत नाही. म्हणुन मग अशा माणसांमधे "माज" या गोष्टीविषयी अनेक गैरसमज असतात. ते वाट्टेल त्या वर्तनाला माज समजतात, "माज करायला तुमच्यात काहीतरी विशेष असावं लागतं" असलं काहीतरी त्यांना वाटत असतं. तर हे आणि यासारखे इतर काही गैरसमज दुर करण्याचा दस्तुरखुद्दांचा (म्हणजे माझा) विचार आहे.

कधीकधी आपल्या ऐकण्यात येतं, काही जण म्हणत असतात "अरे असं एकदा होऊ दे रे, मग आपण पण असा माज करु ना की सगळे बघत राहतील." मला अशा लोकांची कीव येते. कारण माज ही "करायची" गोष्ट नसुन, माज हा "असावा" लागतो - ही मुलभूत गोष्टच त्यांना माहिती नसते.

आधी माज म्हणजे तरी काय हे इथे सांगितलं पाहिजे. तर मुख्य गोष्ट म्हणजे माज ही कोणत्याही प्रकारची भावना नसुन ती मनाची एक अवस्था आहे. पण तरीही "राग" या भावनेला जशी संताप, चीड, तणतण अशी वेगवेगळी अंगं आहेत तशीच ती माजालाही आहेत. त्यातील काही प्रामुख्याने आढळणारी अंगं आपण पाहु यात. या सगळ्या अंगांतील फरक दर्शवणारी रेघ अगदी बारीक पण ठळक आहे.

१. मी लै भारी
या प्रकारात मोडणार्या व्यक्ती "आपणच या विश्वाचा केंद्रबिंदू आहोत" या पद्धतीने वावरत असतात. असं वागण्यामागे किमान एखाद्या गोष्टीत तरी त्यांना काही विशेष नैपुण्य असतं असं काही नाही. तरीही खगोलशास्त्रापासुन अर्थशास्त्रापर्य़ंत कोणत्याही शास्त्राचं आपल्याइतकं ज्ञान कोणालाही नाही, विणकामापासुन पाककलेपर्यंतच्या सर्व कला आपल्याइतक्या कोणालाही अवगत नाहीत आणि हुतुतु पासुन बिलियर्ड पर्यंत कोणत्याही खेळात आपला हात धरणारा कोणी नाही असा त्यांचा एक समज असतो. पण असं प्रत्येकाला पटवुन देण्याचा त्यांचा काही अट्टाहास नसतो. आपापल्या जगात ते खुश असतात. काही अज्ञानी लोक याला अहंकार समजतात.

२. माझी मर्जी
या प्रकारात मोडणारी माणसं "आपण कोणीतरी आहोत" याऐवजी "आपण कोणी असो अथवा नसो, जसे आहोत तसे पण आपल्या मर्जीने वागणार" या पद्धतीने वावरत असतात. ते आपल्याला वाटेल तसंच वागतात, इतरांना पटो अथवा नाही. त्यामुळे अशा लोकाची निर्णयक्षमता चांगली असते, त्यात अनिश्चितपणा नसतो. याला इतर लोक हट्टीपणा किंवा दुराग्रह समजतात.
३. "तु कोण?" किवा "का म्हणुन?"
माजाबाबत जे अनेक गैरसमज आहेत त्यात - "माज हा नेहमी स्वतःबद्दलच्या काहीतरी समजातुनच असतो" - असाही एक प्रसिद्ध गैरसमज आहे. त्याला या प्रकारात मोडणारी माणसे खोटं ठरवतात.या लोकांची ओळख म्हणजे त्याना "अमुक अमुक कर" असं सांगितलं तर "तु कोण मला सांगणारा?" किंवा "का म्हणुन मी असं करु?" असं उत्तर मिळतं. त्यांचं वर्तन "मी म्हणजे कोण!" किंवा "मला असं वाटतं" याऐवजी "तो मला सांगणारा कोण? मी का असं करायचं" या विचारांनी प्रेरित असतं. अशा वागण्याला अनेकदा तुसडेपणा किंवा खडुसपणा म्हटलं जातं.

तर प्रामुख्याने हे आणि अजुनही बरेच प्रकार असतात. काही लोकांमधे एकापेक्षा जास्त प्रकारच्या माजाच्या छटा पहायला मिळतात. जिथे हे सगळे प्रकार एकत्र येतात तिथे अजुन वरच्या पातळीचा माज तयार होतो. त्याला आपण अत्युच्च माज म्हणुया. या पातळीचा माज असणार्यांची संख्या फार कमी असते. कारण या पातळीचा माज करायला अतिशय खंबीर स्वभाव असावा लागतो. षडरिपूंवरही विजय मिळवावा लागतो.त्याच्याही पुढच्या पातळीवर गेलेल्या माणसांमधे recursive माज असतो. म्हणजे आपल्याला माज आहे याचा पण त्यांनामाज असतो. असं करत करत तो माज वाढतच असतो. त्याला आपण परमोच्च माज म्हणुया. या पातळीवर फार म्हणजे फारच कमी जण पोचतात. आणि याच्याही वरच्या पातळीवर गेलं असता, आपल्याला माज नसुन माजाची निर्मिती आपल्यातुनच होते आहे अशा निर्णयास माणुस पोचतो. आपल्यातुनच माज निर्माण होत असेल तर आपल्यालाच माज कसा असेल? याला आपण सर्वोच्च माज म्हणुया. सर्वोच्च माजाची अवस्था आणि मोक्षाची अवस्था यात फारसा फरक नाही. या पातळीवर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं असतात.

तात्पर्य म्हणजे मोक्षाची अवस्था गाठायला माजाचा रस्त्या सुद्धा आहे.एक लक्षात ठेवा, तुम्हाला माज असेल तर तो आपोआप होतो, तो कधीही "करावा" लागत नाही.

Tuesday, August 28, 2007

श्रावण...

निसर्गवेड्यांना, कवींना, लेखकांना मोहवणारा श्रावण. त्याची कितीतरी रूपं. ती रूपं शब्दांत पकडण्याचा प्रयत्नही अनेकदा झालेला. सुभाष इनामदार यांनी केलेला हा असाच एक वेगळा प्रयत्न.

Wednesday, August 22, 2007

हॅलो ब्रदर!


बंधुत्व म्हणजे "नात्याने बांधलेले'. आपल्याकडे मैत्रीचा उ"जिवाभावाची मैत्री' असा केला जातो, ज्यात बंधुता आहे. ही भावना गेल्या कित्येक शतकांपासून आपल्याकडे दृढ आहे. अलीकडच्या जागतिकीकरणामुळे बंधुत्वाला वैश्‍विकतेची जोड मिळाली आहे, इतकेच.

विनायक पात्रुडकर

परवाच मराठीत एक नाटक आले, त्याचे नाव आहे "ए भाऊ, डोकं नको खाऊ.' गंमत वाटली. आपण बोली भाषेत असे शब्द नेहमी वापरतो. फक्त सवयीमुळे त्यातल्या गर्भितार्थाकडे दुर्लक्ष होते. "डोकं नको खाऊ' असा त्रागा व्यक्त करतानाही "ए भाऊ' संबोधण्याची आपली पद्धतच बरेच काही सांगून जाते. जाता-येता आपण तसा, "ओ भाऊ', "भावड्या', "दादा', "दादासाहेब', "भाऊसाहेब' असे उल्लेख करीतच असतो. म्हणजे समोरच्या माणसाबद्दल संताप आला तरी अनेकदा "तुम्ही आमच्या भावासारखे, आम्हाला समजावून घ्या' असा उपरोधिक उल्लेख करीत संताप आवरण्याचा प्रयत्न करतो. बंधुत्वाबद्दलची जशी ही एक बाजू आहे, तसा महाभारताचा भावा-भावांमधील तेढ चितारणारा प्रचंड मोठा इतिहासही आपल्याला आहे. भावांमधील अतिप्रेम आणि अतिद्वेष अशा दोन्ही घटना आपल्याला परंपरेतून मिळतात. रामायणातून राम-लक्ष्मणाच्या प्रेमाने ओथंबलेल्या इतिहासाची साक्ष मनात ठेवावी, की एकमेकांचे प्राण घेण्यासाठी सज्ज झालेल्या कौरव-पांडवांचे कुरुक्षेत्र डोळ्यांपुढे आणावे, असा प्रश्‍नही मनात येऊन जातो. दोन्हींचे संदर्भ वेगळे असले, तरी त्यांच्यातल्या नात्यांची मूळ गुंफण भावाभोवती केंद्रीभूत आहे, हेही तितकेच सत्य आहे. अर्थात या नात्यांवर ग्रंथच्या ग्रंथ आपल्याकडे लिहून झाले आहेत. यातील मानवी भावना मूलभूत असल्याने, इतक्‍या वर्षांनंतरही पुराणातले हे ग्रंथ आपण विसरू शकलो नाही. बंधुत्वाच्या नात्याची हीच ताकद याला कारणीभूत आहे.
सुधारणेच्या अलीकडच्या काळात "विश्‍वबंधुता' हा शब्दही रूढ झाला आहे. बांगलादेशाच्या मुक्तीनंतर त्या देशाने भारताचा उल्लेख "मोठा भाऊ' असा केला होता.
अलीकडे जागतिकीकरणानंतर जगाचे खेडे बनले, देशाच्या सीमा आखूड वाटू लागल्या आणि परदेशात जाण्याचे अप्रूपही संपले. राजाश्रयाचा प्रकारही रूढ झाला. चीनने तिबेट काबीज केल्यानंतर दलाई लामा यांनी त्यांच्या शेकडो शिष्यांसह भारतात राजाश्रय स्वीकारला. अगदी अलीकडचे उदाहरण तस्लिमा नसरीन यांचे. मूळची बांगलादेशाची ही बंडखोर लेखिका सध्या कोलकत्यात वास्तव्य करून आहे. त्यांना आपल्या देशात सुरक्षित वाटते, हेच आपले यश. भावा-भावांमधील प्रेमाचे कित्येक चित्रपट निघाले. बंधुत्वाच्या नात्यामध्ये मैत्रीची सुंदर किनार असते. या नात्यात मोकळेपणा असला, तर हे बंध अधिक अतूट होतात, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच समोरच्याविषयी प्रेम असेल, सौहार्दाची भावना असेल, सौख्य असेल, तर त्याचे रूपांतर बंधुत्वात व्हायला वेळ लागत नाही. "शिंडलर्स लिस्ट' या ऑस्करविजेत्या चित्रपटात ज्यूंवरच्या हल्ल्यामुळे अस्वस्थ झालेला ऑस्कर शिंडलर नंतर अकराशे ज्यूंना वाचवितो. 1993 सालच्या या चित्रपटाने जगभर मोठे यश मिळविले होते. दोन महायुद्धांनंतर जगभर बंधुत्वाची भावना अधिक बळकट
होत गेली. आपापल्या देशांमधले वादाचे प्रश्‍न चर्चेने सोडविण्यावर भर वाढला. बंधुत्वाच्या भावनेचा वारंवार उल्लेख होत गेला. आज तर जगभर नाते बांधण्यावर आणि टिकविण्यावर संवाद होताना दिसतो आहे. कुणी संकटात असेल, तर त्याला मदत करताना बंधुत्वाची निखळ भावना ही बळकटी देणारी असते. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीने भावांच्या प्रेमावर शेकडो चित्रपट काढले. "राम-लखन'पासून "हॅलो ब्रदर'सारखे चित्रपट तर लोकांनी डोक्‍यावर घेतले. प्रत्येकाच्याच मनात बंधुत्वाच्या भावनेची उत्कटता असते. संधी मिळाली, की ही भावना उचंबळून येते आणि भावनेच्या नात्याचे नवे बंध निर्माण होतात. जाता-जाता एक वेगळा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे बऱ्याचदा शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र, या भावनेतून नव्या बंधुत्वाचा जन्म होताना दिसतो आहे. आपल्या देशाला हवे असलेले अनेक गुन्हेगार शेजारच्या देशात दडी मारून बसले आहेत.
शत्रुभावना ठेवणाऱ्या देशामुळे आपल्याला त्याच्या बंधुत्वाची किंमतही चुकवावी लागते आहे; जसे हे "भाई' लोक आपल्याला त्रासदायक ठरतात, तशी त्यांची "भाईगिरी'देखील. असा बंधुभाव सोडला, तर जगातील सर्व जण आनंदाने नांदावेत, अशीच भावना मनात राहायला हवी. अर्थात हे रहाटगाडगं असंच सुरू राहणार. घर म्हटलं की भांड्यांचे आवाज येणारच; पण हे भांडं शेजारच्याच्या डोक्‍याला लागू नये, यासाठी काळजी घेणं, हे बंधुत्व. इतकं लक्षात ठेवलं तरी नव्या जमान्यातही असलेल्या मैत्रीच्या आडव्यातिडव्या भावनांना बंधुत्वाचं ऋण समजू शकेल. तेव्हा म्हणत राहा "हॅलो ब्रदर' कारण "बिग ब्रदर' (ईश्‍वर) हे सारं पाहतोच आहे.

Monday, August 13, 2007

गुरु आहेत..

' गुरु ' आहेत..
निसर्गातील भटकंतीतले ते क्षण ,
' शिकवतात ' जे , समरसून बहरण्याचे महत्व..

' गुरु ' आहेत..
पाखरांच्या सहवासातले ते क्षण ,
' शिकवतात ' जे , घरटयातून झेपेचे महत्व..

' गुरु ' आहेत..
प्राण्यांच्या निरीक्षणाचे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , बलाढ्यपणे टिकायचे महत्व..

' गुरु ' आहेत..
दु:ख देणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , सुख निद्रेचे महत्व..

' गुरु ' आहेत..
अश्रू पाझरवणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , हास्य कारंजींचे महत्व..

' गुरु ' आहेत..
शत्रूशी सामना होणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , आत्मविश्वासाच्या ताकदीचे महत्व..

' गुरु ' आहेत..
टीकेचा आघात देणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , सुधारणा करण्याचे महत्व..

' गुरु ' आहेत..
स्नेहींच्या विरहाचे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , मनोमिलन जपण्याचे महत्व..

अन,

' गुरु ' आहेत..
सुन्न करणारे मॄत्यूचे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , जानदार क्षणभंगुरत्वाचे महत्व..

क्षण अन क्षण आहे ' गुरु ' ,
" शिका , घडा अन बना स्वत:ही ' गुरु ' "
गुरुपौर्णिमेदिनी मंत्र हा उच्चारू..

- स्वप्ना कोल्हे

Tuesday, July 31, 2007

राम नदी किनारे मेरो गाव सावरे आजय्यो, सावरे आजय्यो.

अहो फेकाडे भावोजी, ऐकले का ? आपल्या पुण्यात म्हणे राम नदी चक्क गिळकृत झाली, तिला म्हणे अनिर्बंध अतिक्रमणांची मगर "मिठी" बसली.

अग मीने, मीने , मीने, तु म्हणतेस तरी काय ? आता पर्यंत फक्त सरस्वती नदी लुप्त झाल्याचे वाचले होते, हा त्यातलाच प्रकार की काय ?

पण काय हो फेकाडे भावोजी, हे कसे काय झाले असावे हो ? काही कळत नाही.

अहो मीनावहीनी, गुप्तधनाची गंगा जमीनीखालुन वाहु लागली की कधी कधी होते असे. तिच्या प्रवाहात हा "नदीचा केलेला नाला" लोप पावतो, त्याचे स्वतंत्र अस्तीत्व नाहीसे होते, आता हे फारसे मनाला लावुन घेयचे नाही बर का. आता बघ, येथे माणसांनाच रहायला जागा नाही मग नदी, नाले, ओहोळ, आणि ओढे यांना जागा कुठुन मिळणार ? पावसाळ्यात होतो अधुन मधुन त्रास, मग जरासा आरडाओरडा होतो खरा, पण तो तेवढ्या पुरताच. सरस्वती लुप्त पावली तेव्हा कोणी काहीतरी बोंब मारल्याची आठवते काय ? आपण आपले वाचायचे व विसरुन जायचे.

परत मीने बर का तुला म्हणुन सांगतो, लोकांना बोंबाबोंब करायची सवयच लागली आहे. दर वर्षी काहीतरी नवे कारण लागते,. गेल्या वर्षी आठवते का ग तुला, "खड्डे रस्तात की खड्डात रस्ते" करत केवढे रान उठवले होते, आता यंदाला हा नवीन विषय "नदीत, ओढ्यावर, नाल्यावर अनधिकृत बांधकामे की बांधकामातुन पाण्याचे प्रवाह ? "

फेकाडे भावोजी खर आहे तुमचे बोलणे, बसा हं, तुमच्यासाठी गरमागरम कांद्याची खेकडा भजी करते, तो वर बोट येयीलच, तुम्हाला आमच्या सोसायटीतुन बाहेर सोडायला.

हरे कृष्णजी

सदर्भ -
सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा - रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'


(पुर्वी आकाशवाणीवर एक श्रुतीका लागायची. टेकाडे भावजी, मीना वहीनी ही त्यातली प्रमुख पात्रे. त्या धर्तीवर? )

Sunday, July 29, 2007

त्रिवार वंदन तुला गुरु..

जेव्हा ,
मन भरकटते ,
विचारांच्या सागरात ,
गुरु , दीपस्तंभ बनतोस तू..
तेव्हा ,
बनते तरबेज खलाशी मी..

जेव्हा ,
अनोळखी होते ,
आरशातल्या छबीत ,
गुरु , ओळख पटवतोस तू..
तेव्हा ,
होते लक्षवेधी चेहरा मी..

जेव्हा ,
एकटी पडते ,
स्वत:च्याच गावात ,
गुरु , पाठिंबा असतोस तू..
तेव्हा ,
करते बलाढ्य नेतृत्व मी..

जेव्हा ,
धाडस कोसळते ,
भयाच्या कोठडीत ,
गुरु , प्रेरणा देतोस तू..
तेव्हा ,
घेते उत्तुंग भरारी मी..

जेव्हा ,
निराशा पसरते ,
अपयशाच्या अंधारात ,
गुरु , प्रकाश होतोस तू..
तेव्हा ,
बघते नवी दुनिया मी..

आता ,
नभावरही नाव माझे लिहीन ,
गुरु , लेखणी माझी आहेस तू..

त्रिवार वंदन तुला गुरु..त्रिवार वंदन तुला गुरु..


- स्वप्ना कोल्हे

Friday, July 27, 2007

फक्त थोडा वेळ...

एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश पुन्हा समुद्रात सोडतोय,'' त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिले.
""पण का?''
""सोपं आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल. हळूहळू त्याची किरणं तप्त होतील. ते ऊन या माशांना सहन होणार नाही. मासे मरतील. म्हणून त्याआधीच मी त्यांना पुन्हा समुद्रात सोडतो आहे.''
""भल्या मित्रा, आपल्या देशात असे कित्येक किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे आहेत. रोज असे किती तरी स्टारफिश लाटांबरोबर वाळूवर पडत असतील. तू इथे काही स्टारफिश पुन्हा पाण्यात सोडून काय साध्य होणार आहे?'' बोलणं सुरू असतानाही त्या तरुणाचे हात थांबलेले नव्हते. लेखकाचा प्रश्‍न ऐकून त्यानं एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात सोडला. तो म्हणाला, ""या एकासाठी तर फरक पडला ना! मला वाटतं, आपल्या सर्वांमध्ये एक शक्ती आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात निश्‍चितच फरक पडू शकतो. परमेश्‍वराने आपल्या सर्वांनाच ही देणगी दिली आहे. एकामुळे दुसऱ्याच्या, दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या आणि तिसऱ्यामुळे चौथ्याच्या आयुष्यात फरक पडू शकतो. आपण फक्त आपला "स्टारफिश' शोधायला हवा! त्याला निवडून हळुवारपणे पाण्यात सोडायला हवं. असं झालं तर हे जग नितांतसुंदर होईल.''
या गोष्टीचा लेखक माहीत नाही; परंतु तो मोठा द्रष्टा आहे, हे निश्‍चित. आपण बारकाईने पाहिले, तर असे कितीतरी स्टारफिश आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांना उचलणे आणि प्रवाहात सोडणे, एवढे लहानसे काम आहे. त्याला पैसा लागतो का? नक्कीच नाही. परवाच एका आजोबांची भेट झाली. निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपल्या परीने त्यावर उपाय शोधला. जवळच्याच एका रुग्णालयात ते रोज जाऊ लागले. रुग्णांना धीर देणे, गरज असल्यास त्यांच्याजवळ बसणे, बरोबर आलेल्या नातेवाइकांना पाय मोकळे करण्यासाठी उसंत देणे, एखादा रुग्ण दगावल्यास पुढच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामे ते उत्साहाने करू लागले. ते म्हणाले, ""त्या रुग्णांवर उपचार करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत; पण त्यांना द्यायला वेळ आहे. मी तोच देतो.''
व.पुं.ची एक कथा आहे. "केव्हाही बोलवा' या संस्थेचे वर्णन त्यात आहे. सात जणांचा गट लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जातो. रुग्णालयात थांबणे, गर्दीच्या वेळेत गरजूंसाठी रेल्वेमध्ये जागा धरून ठेवणे, अशी कामे हा गट करत असतो. ही कथा काल्पनिक असली, तरी त्यामागची स्फूर्ती, कल्पना मात्र काल्पनिक नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. फक्त पैसा देऊन काही साध्य होते, असे नाही. वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते.
आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक तास आपल्या "स्टारफिश'साठी द्यायचे ठरवले तर? हे अशक्‍य आहे? नक्कीच नाही. थोडा विचार आणि थोडा वेळ, एवढेच हवे आहे. "आठवड्यातून फक्त एक तास' हे सूत्र पुरेसे आहे.
एखाद्या डॉक्‍टरने थोडा वेळ काढला, तर एका तासात कमीत कमी पाच गरीब रुग्णांना तरी तपासता येईल. त्यांना ती मोठी मदत होईल. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली की कार्यक्षमता वाढेल. त्यांना पुढेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे मिळत राहतील. मुळात त्यांच्यात आरोग्याविषयी जागरुकता निर्माण होईल. या जागरुकतेचा सकारात्मक परिणाम कित्येकांवर होईल.
एखाद्या विषयातील तज्ज्ञाने विद्यार्थ्यांसाठी वेळ द्यायला सुरवात केली, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता निर्माण होईल. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही माहिती मिळेल. त्याचा फायदा पुढील आयुष्यात होऊ शकेल. हीच गोष्ट त्या मुलांकडून पुढे पाझरत जाईल.
विद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांसाठी किंवा अनाथ मुलांसाठी असा वेळ दिला, तर त्यांच्या अंगणात आनंदाचे झाड फुलेल. अंतिम टप्प्यावर असणाऱ्यांना कृतार्थता आणि पहिल्या टप्प्यावर असणाऱ्यांना आनंदाची देणगी, हे अगदी सहज होऊ शकेल.
आपण कदाचित खूपसारा वेळ, पैसे देऊ शकणार नाही; पण आठवड्यातून फक्त एक तास? होईल, हे नक्की होईल. कवी संदीप खरे म्हणतो, "मुहूर्त माझा तोच, ज्या क्षणी हो इच्छा...' चला, एक पाऊल तरी पुढे टाकू.

अभिजित थिटे

Thursday, July 19, 2007

"जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही "

विक्रमा अशी कोणती गोष्ट आहे की ज्यात भारताची बरोबरी चीन करु शकत नाही ? भारतात जे जमते ते चीनमधे जमत नाही ? जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही ? वेताळाने गुगली टाकत प्रश्न विचारला. माझा प्रश्नाचे उत्तर दे नाहीतर .......

वेताळा ऐक तर, तु २३ जुनचा साप्ताहीक सकाळ ( चीनमधे हे कसे जमते ? ) वाचलेला दिसतोस. हा प्रश्न त्याचाच परिणाम आहे. असो. तुला ऐकुन ठावुक असेलच चीनने तिबेटच्या पठारावर अत्यंत प्रतीकुल परीस्थीतीत रेल्वे मार्ग बांधला, त्यांच्या कडे ४३२ किलोमीटरच्या वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन आहे .

विक्रमा आता तु मला परत या रेल्वे वर लेक्चर देणार आहेस काय रे ? आपल्याकडे कोणत्या परिस्थितीत कोकण रेल्वे बांधली विसरलास काय रे ? आता बोरीवली-विरार मधला चौपदरी मार्ग ही बांधुन पुरा होतोय ना ? होणार आहे ना ?

अरे वेताळा मला रेल्वे लाईन नव्हे तर त्यावरील पादचारी पुलाबद्द्ल तुला काहीतरी सांगायचय. मुंबापुरीत, चरनी रोड नामक रेल्वेस्थानका बाहेरील पादचारी पुल बांधल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील येवढ्याच वर्षात मोडकळीस आला. आता तो का व कसा जीर्ण झाला हा विषय वेगळा. मग तो पाडुन त्या जागी नवीन पादचारी पुल बांधायला घेतला. नवा पुल "स्टेट ऑफ आट्‌र्स " असणार होता. या पुलावरुन दररोज लाखो रेल्वे प्रवासी ये जा करीत असत, येथला रस्ताही दक्षिण मुंबईतुन बाहेर पडण्याचा मुख्य रस्ता. मग ते हजारो, लाखो, प्रवासी सरळ रस्तावर, रस्ता पार करण्यासाठी येवु लागले, वाहतुकीस अडथळा होवु लागला, अडथळे, अडचण सर्वांनाच.

अभिमानाची गोष्ट म्हणजे अत्यंत विक्रमी वेळात या पुलाचे बांधकाम पुर्ण झाले, त्याबद्दल लोकप्रतिनीधींनी स्वतःच स्वताला शाबासकी देत अभिमानाने व गर्वाने पाठ थोपाटुन घेतली,

विक्रमा माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नव्हे.
वेताळा ऐक तर खरे, हा बांधकामाचा कालाविधी फक्त जवळ जवळ २१ महीने म्हणजे पावणे दोन वर्षे होता. थोडेसे कमी जास्त, इकडे तिकडे.

आता सांग, ही दिरंगाई, हा विलंब , हा जनतेचा सोशीकपणा, ही कॉंट्रक्टर व संबधीताची बेपर्वायी, केवळ भारतातच शक्य आहे, नाही का ? चीनला हे जमणे व परवडणे नाही असे तुला वाटत नाही काय रे ?

तु बोललास व मी चाललो, या पुलावरुन.


हरे कृष्णजी

Tuesday, July 3, 2007

** करेल वटपौर्णिमा साजरी.. **

विचार आधुनिक जरी ,
श्रध्दा देवावर माझी
होईन सौ जेव्हा मी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..

असेल ऑफिस जरी,
वडपूजा जमणार नाही
डगाळ आणून घरी,
करेल वटपौर्णिमा साजरी..

एवढा आटापिटा ,
फक्त तुझ्या साथीसाठी
होऊन थोडी स्वार्थी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..

विज्ञान म्हणते,
राखेत संपेल सर्वकाही
भोळे मन म्हणते,
तरीही...

एकच ' हा ' जन्म जरी ,
सावित्रीची लेक मी
अनंताच्या वाटेवरही
करेल तुला साथ मी....


- स्वप्ना

** जन्मोजन्मी हाच पती ? **

चालले मी चालले , वड पूजायला
जन्मोजन्मी हाच पती मागायला..

माझ्या ' ह्यांची ' काय वर्णावी थोरवी
' ह्यांची ' आहे मी एकमेव ' चाहती '..
(दूसरे कुणीच ह्यांचं कौतुक करत नाही)

सांगते ' ह्यांची ' करमणूकीची साधनं..

ऑफिस , मित्र , टीव्ही , वर्तमानपत्र
ओर्कुटींग आणि कविता करणं..

वेळ मिळताच माझ्याशी वाद घालणं
आणि सासरच्यांची खेचाखेची करणं..

पण , मला महत्वाचं ह्यांच निर्व्यसनी असणं
भावतं , कामात माझ्या मदतीसाठी धावणं..

मी आजारी पडले की मला जपणं
प्रेम शब्दांतून नाही , कृतीतून व्यक्त करणं..

'अनोळखी देवदूतापेक्षा ओळखीचा राक्षस बरा' मला पटते
(देवा , गंमतीने बोलले रे)

म्हणून , जन्मोजन्मी मी हाच पती मागते..


- स्वप्ना

** आली वट वट पौर्णिमा **

आली वट वट पौर्णिमा
की लागते मला धडकी भरायला..

अरे यार , सौ माझी भलतीच भारी
माझे ' आरक्षण ' करते जन्मोजन्मीसाठी..

कॉलेज मधली परी , ऑफिसातली फटाकडी
सिनेमातली नटी , झुरतो सा-यांसाठी..

पण देवा , असा कसा रे तुझा न्याय
दर जन्मी मला ' वेगळा ' पर्यायच नाय ?

एखाद जन्मी मिळाली असती ' विश्वसुंदरी '
तर माझीही वट वाढली असती..

पण, ती सुंदरी मनाने सुंदर असेल ?
' प्रसंगी ' माझी सावित्री ती बनेल ?

दूसरीकडे माझी सौ..

तसं बावळंच आहे हिचं ध्यान
पण कर्तव्यांचे हिला सदा भान..

माझ्या गबाळ अवतारातही मला हिरो म्हणते
माझ्या सुमार कवितांना हमखास दाद देते..

ऑफिस, घर ,पाहुणे तारेवरची कसरत करते
फाटक्या संसाराला माझ्या तीच ठिगळ लावते..

तिच्या सच्च्या प्रेमापुढे मी हरतो
तिची वटपौर्णिमा फळावी हेच मागतो..


- स्वप्ना

Monday, June 25, 2007

युवाशक्तीचा अनोखा आविष्कार- "युवा फॉर सेवा'

वरवर पाहता अतिशय सामान्य आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या प्रसंगांमधून प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीने अथवा छोट्याशा समूहाने एखादा उपक्रम हाती घेणं आणि पाहता पाहता त्या लहानशा गोष्टीतून पुढे अनेकांना कल्याणकारक ठरणारा प्रकल्प उभा राहणं हा घटनाक्रम.
२००५ च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या न्यूऑर्लिन्स परिसराला कॅट्रिना चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि सिऍटलमधल्या University of Washington मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे काही भारतीय विद्यार्थी हळहळले. आपद्‌ग्रस्तांसाठी आपणही काही करायला हवं, ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देईना. पण आधीच तुटपुंज्या असलेल्या विद्यावेतनातून काही हिस्सा मदतनिधीसाठी दान करणं त्यांना शक्‍य नव्हतं. आणि अभ्यास/ संशोधन सांभाळून प्रत्यक्ष मदतकार्यासाठी जाणंही सहजसाध्य नव्हतं. तेव्हा या विद्यार्थ्यांनी एक वेगळी वाट शोधली. अमेरिकेत बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉलचे आंतरविद्यापीठ सामने विद्यापीठांच्या स्टेडियम्समध्येच होतात. अतिशय चुरशीने खेळले जाणारे हे सामने पाहायला प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या प्रेक्षकांना विद्यापीठ परिसरातले पार्किंग लॉट्‌स दाखवणं, पार्किंग परमिट्‌स विकणं इत्यादी कामांसाठी सामन्याआधी ३-४ तास काही स्वयंसेवकांची आवश्‍यकता विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला भासते आणि या स्वयंसेवकांना थोडाफार मेहनतानाही मिळतो. भारतीय विद्यार्थ्यांच्या त्या गटाने अशा सामन्यांसाठी व्हॉलेंटियर करून मिळालेली रक्कम मदतनिधीला दान करायचं ठरवलं. विद्यापीठ प्रशासनाने त्याला कौतुकाने पाठिंबा दिला आणि कॅट्रिनाग्रस्तांसाठी मदत करण्याची या गटाची इच्छा अशा रीतीने पूर्ण झाली.

यातला एक विद्यार्थी-शोभित माथुरला- या यशामुळे त्याच्या अंगी असलेल्या सामाजिक जाणिवेचे भान आलं. सिऍटल परिसरात सक्रिय असलेल्या आणि भारतीय कार्यकर्त्यांचा भरणा असलेल्या Sewa International या संस्थेशी त्याने संपर्क साधला. आणि प्रामुख्याने भारतात किंवा इतर ठिकाणीही एखाद्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी स्वतःचा वेळ खर्चण्याची... नव्हे वापरण्याची त्याने तयारी दर्शवली. सेवा इंटरनॅशनल ही संस्था जगातल्या १५ हून अधिक देशांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय इ. स्वरूपाचे उपक्रम चालवते. Sewa च्या पदाधिकाऱ्यांची शोभितच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आणि त्याची शैक्षणिक पार्श्‍वभूमी आणि प्रकल्पांची गरज पाहून भारतातला नाही, पण सुरिनाममधला एक प्रकल्प त्याच्यासाठी निवडला.

दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर टोकाला वसलेला "सुरिनाम' हा सुमारे ५ लाख लोकसंख्येचा छोटासा देश. या देशातले जवळजवळ एक तृतीयांश नागरिक भारतीय वंशाचे आहेत. अठराव्या शतकात ब्रिटिश आणि उच्च वसाहतवाद्यांनी ऊसमळ्यात काम करण्यासाठी आणलेल्या भारतीय मजुरांचे हे वंशज! या लहान देशात शैक्षणिक सुविधांचा तसा अभावच आहे. त्यामुळे काही विषयांचे advanced कोर्सेस चालवण्यासाठी Sewa सारख्या संस्था University of Suriname ला सहकार्य करतात. IT ध्ये भारताने केलेल्या प्रगतीचा डंका सुरिनाममध्ये वाजू लागला. आणि IT शी संबंधित आधुनिक संशोधनाची तोंडओळख आपल्या विद्यार्थ्यांना करून देणारा एक लहानसा तरी कोर्स चालू करण्याची सुरिनाम युनिव्हर्सिटीला निकड वाटू लागली. अमेरिकेतल्या अग्रगण्य विद्यापीठात Computer Science MS झालेला शोभित ही गरज पूर्ण करू शकेल, अशी खात्री Sewa च्या कार्यकर्त्यांना पटली. University of Suriname ध्ये Advanced IT चा short term कोर्स शिकवण्याच्या प्रोजेक्‍टसाठी शोभितची निवड झाली. युवा विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प म्हणून त्याचं "युवा फॉर सेवा' (YFS) असं बारसंही झालं.

MS पूर्ण झाल्यानंतर नोकरी सुरू होईपर्यंतचा दीड महिना शोभितने सुरिनाममध्ये YFS Fellow म्हणून वेचला. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी I.T. आणि इतर Computer विषयक कोर्सेस शिकवले. पुढील शिक्षणाच्या संधींबद्दल मार्गदर्शन केलं. सुरिनाममधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांबद्दल अधिक जाणून घेतलं आणि मुख्य म्हणजे Sewa International च्या कार्यपद्धतीचंही जवळून निरीक्षण केलं. एका अनोख्या अनुभवाची समृद्ध शिदोरी घेऊन तो अमेरिकेला परतला आणि Amazon com ध्‌ मध्ये रुजूही झाला.

चाचपणीतून यश रुजलं!
पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याने Sewa कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वासही दुणावला. समाजासाठी काही काळ देण्याची इच्छा असलेले विद्यार्थी इतरही विद्यापीठांमध्ये असतील. आपण त्यांना तशा संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागलं. शैक्षणिक, वैद्यकीय, ग्रामविकास इत्यादी विषयांशी संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या इतरही विद्यार्थ्यांसाठी YFS योजना मोठ्या स्वरूपात राबवता येईल का, याची चाचपणी त्यांनी सुरू केली. शोभितने या वर्षी आयोजनात (overall coordination) सिंहाचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवली आणि या साऱ्यांच्या परिश्रमाने जून २००७ पासून YFS Fellowship Program साकारत आहे.

शिकत असताना उन्हाळी सुट्टीचा कालखंड किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम अथवा नोकरी सुरू होण्यापूर्वीचा कालखंड एखाद्या सेवाभावी प्रकल्पासाठी देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा Fellowship Program खुला आहे. Sewa International ने आपल्या सहकारी संस्थांच्या मदतीने या वर्षीसाठी अमेरिकेत ४, सुरिनाममध्ये १ आणि भारतात २० प्रकल्पांची यादी निश्‍चित केली आहे. मराठी भाषिकांसाठी विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातले २० ही प्रकल्प महाराष्ट्रातच आहेत! YFS Fellow नी अमेरिकेतल्या Projects साठी किमान ३ आठवडे आणि भारतातल्या Projects साठी किमान ३ महिन्यापर्यंतचा कालावधी देणं अपेक्षित आहे. आलेल्या अर्जदारांची शैक्षणिक पार्श्‍वभूमी, त्यांच्या पसंतीचं क्षेत्र, निर्धारित प्रकल्पाचं स्वरूप याची छाननी करून अर्ज मुलाखतींसाठी निवडले जातात. मुलाखतींदरम्यान भारतातल्या ग्रामीण भागात काम करताना येऊ शकणाऱ्या अडचणींची सविस्तर कल्पना देऊन अंतिम उमेदवारांच्या निवडीचं काम सध्या जोरात सुरू आहे. निवडलेल्या उमेदवारांसाठी आठवडाभराचा मार्गदर्शक वर्गही चालवला जाईल. प्रकल्पांचं निश्‍चित स्वरूप, भारतातले महत्त्वाचे पत्ते, स्थानिक चालीरीतींचा जुजबी परिचय आदी गोष्टींचा त्यात समावेश असेल. या चाळण्यांतून पार झालेले विद्यार्थी आपापल्या Project location ला पाठवले जातील. YFS Fellows ची निर्धारित प्रकल्पाच्या गावी एखाद्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली जाईल. स्थानिक संस्कृतीचा त्यांना जवळून परिचय व्हावा आणि Sewa परिवाराचा एक सदस्य असल्याप्रमाणेच त्यांना राहता यावं, यासाठी हा खटाटोप!

माणसामाणसातला परस्परविश्‍वास कमी होत असण्याच्या सध्याच्या काळात महाराष्ट्रातल्या २० कार्यकर्त्यांनी अमेरिकेतून येणाऱ्या अनोळखी विद्यार्थ्यांना इतक्‍या प्रदीर्घ कालावधीसाठी आपल्या घरी सामावून घेण्याची तयारी दर्शवणं ही बाब निश्‍चितच कौतुकास्पद आहे!

भारतातले काही ठळक प्रकल्प
या २० पैकी काही ठळक प्रकल्पांचा येथे उल्लेख करणं उचित ठरेल. धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या आदिवासी गावात "बारीपाडा ग्रामविकास समिती' तिथल्या ग्रामस्थांसाठी निरनिराळे उपक्रम चालवते. त्यापैकी "कुपोषण रोखण्यासाठी उपाययोजना,' "जैव ऊर्जा निर्मिती' इ. प्रश्‍नांवर काम करण्यासाठी संस्थेला मुख्यतः पर्यावरण आणि Nutritional Sciences या विषयांच्या विद्यार्थी-स्वयंसेवकांची आवश्‍यकता आहे. नंदूरबारमधील आदिवासींसाठी काम करणाऱ्या "हेडगेवार सेवा समिती'ला सातपुडा पर्वतरांगांमध्ये Eco-tourism ला वाव देता येणं शक्‍य आहे का आणि त्यायोगे आदिवासींना उत्पन्नाचं अजून एक साधन मिळवून देता येईल का, याची चाचपणी करायची आहे. शिवाय जवळपासच्या पाड्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना परस्पर संपर्क राखणं सोयीचं जावं यासाठी HAM Radio Station स्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटन आणि tele communications शिकणारे विद्यार्थी इथे येणं अपेक्षित आहे. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे चालवलं जाणारं इस्पितळ हा मराठवाड्यातल्या गोरगरिबांना मोठाच आधार आहे. परंतु अशिक्षित खेडुतांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी "प्रतिष्ठान'ला स्वयंसेवक हवे आहेत. पुण्यातली "स्वरूपवर्धिनी' ही संस्था विज्ञानशिक्षणाची गोडी खेडोपाड्यातल्या शाळकरी मुलांनाही लागावी यासाठी फिरत्या प्रयोगशाळा चालवते. या फिरत्या प्रयोगशाळा अधिकाधिक सुसज्ज आणि उपयुक्त बनवण्यासाठी काय करता येईल, हे पडताळून पाहण्यासाठी "स्वरूपवर्धिनी'ला मदत हवी आहे. याव्यतिरिक्त येरवड्यातील "सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' सांगोल्यातील "माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान'सारख्या इतरही काही संस्था आपल्या प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास उत्सुक आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला वेळ समाजकार्यासाठी देणं यात नवीन काहीच नाही. अनिवासी भारतीयांच्या मुलांना भारतातील सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणारी "Indicorps' ही संस?थाही गेली काही वर्ष कार्यरत आहेच. पण कुठल्याही उद्योगसमूहाचं पाठबळ नसताना किंवा पालकांचीही विशेष मदत न घेता केवळ युवकांनी पुढाकार घेऊन युवा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम विरळाच म्हणायला हवा!

कल्पना आवडली म्हणूनच पटली
YFS आयोजकांना या निमित्ताने काही विशेष अनुभवही आले. YFS चे Application forms अमेरिकेतल्या जास्तीत जास्त विद्यापीठांमध्ये पाठवण्यात आले होते. बहुसंख्य projects भारतात असल्याने, अमेरिकन विद्यापीठांत शिकणारे भारतीय आणि अमेरिकेत वाढलेल्या दुसऱ्या पिढीतले भारतीय वंशाचे विद्यार्थी प्रामुख्याने अर्ज करतील, अशी आयोजकांची अपेक्षा होती. पण भारताशी कुठलाही संबंध नसलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज करून आयोजकांना सुखद धक्का दिला. शिवाय केवळ अमेरिकेतल्याच विद्यापीठांशी संपर्क साधला असताना युक्रेनमधून YFS बद्दल विचारणा करणारे इमेल्स आल्याचं पाहून आयोजक चक्रावले. थोड्या चौकशीअंती काही अर्जदारांनी YFS ची कल्पना आवडून परस्परच इंटरनेटवरून आपल्या chat-friends ना अर्जाच्या soft copies पाठवल्याचं त्यांना कळलं. सेवाभावाचं हे अनोखं Globalization निश्‍चितच स्वागतार्ह आहे... नाही का?

YFS चा हा प्रयोग मोठ्या स्वरूपात प्रथमच येत्या जूनपासून सुरू होत आहे. या वर्षीची अर्ज भरण्याची अंतिम मुदत उलटून गेली असली तरी युवाशक्तीकडून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून हा प्रयोग पुढच्या वर्षीही आणखी मोठ्या स्वरूपात सादर करण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहील. शिवाय युक्रेनियन अनुभवामुळे माहिती-महाजालाचा जास्तीत जास्त वापर करून अमेरिकेबरोबरच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपमधल्या विद्यार्थ्यांना साद घालण्याचा मानसही पक्का झाला आहे. गतवर्षी ओहोळाप्रमाणे सुरवात झालेल्या YFS चा लवकरच जगभरातल्या युवाशक्तीला जनसेवेच्या प्रेरणेने एकत्र आणणारा विराट महानंद होवो, अशी हार्दिक शुभेच्छा!

- श्रेयस लिमये
ेshreyaslimaye@gmail.com
shreyas@u.washington.edu

(YFS बाबत अधिक माहिती www.Sewausa.org/ yava/ yuva.html या संकेतस्थळावर उपलब्धआहे. खेरीज info@sewausa.org ह्या इमेल address ला आपण अधिक प्रश्‍न विचारू शकता.)
\

Saturday, June 23, 2007

खरं तर 'या झोपडीत माझ्या' ही मूळ कविता माझी खूप आवडती आहे, पण विडंबन सुचत गेले आणि धैर्य गोळा करून पोस्ट करतो आहे. या विडंबना बद्दल तुकडोजी महाराजांची मनोमन क्षमा मागतो आहे. मूळ कविता 'या झोपडीत माझ्या' या दुव्यावर वाचता येऊ शकेल.

खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥

खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥

खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥

खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥

पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥

खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥

खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

- सुभाष डिके (कुल)

Wednesday, June 20, 2007

असे उदास दिवस जातात ....

इंबोक्स नाही भारत महिनॉं महिने
पेज वर एक नवा स्कराप नाही दिसत
चाट लिस्ट वर कोणी कोणी महणून ओन् लाईन नाही दिसत
असे उदास दिवस जातात ....
कोणी तरी यावे आन् एक फॉरवॉर्ड जेपीजी तरी टाकावे
तेवढाच डेस्क टॉप वर जेपीजी तरी बदलेल
असे उदास दिवस जातात .... कसे सांगावे

सुनैना

Tuesday, June 19, 2007

जुन्या वेताळाची नवी गोष्ट

हल्ली वेताळ तसा धास्तावला दिसत होता, मधेच स्वताःशीच "मी मांसाहारी नाही हो, खरच मी मांसाहारी नाही, मी फक्त वरणभातावर साजुक तुप घालुन खाणारा माणुस होतो हो, हवे तर आता तुप पण खाणे बंद करतो, मनेका गांधी म्हणाली होती ना गाईचे दुध पण मांसाहारी आहे , तिचे मी ऐकतो, पण नका हो नका मला" असे अर्थाचे काहीतरी पुटपुटत अचानक वेताळ गप्प झाला.

नेहमी माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे म्हणणारा वेताळ, आज आपल्याच विचारात मग्न झालेला होता. काहीच न बोलता मधेच सुस्कारा सोडीत या खांद्यावरुन त्या खांद्यावर फिरणाऱ्या वेताळाचे हाल विक्रमाला आज पहावले नाही, स्वताःहुन त्याने आज बोलायचे ठरवले.
बा वेताळा, काय झाले सांगशील की नाही , तुझे दुःख दुर करणे माझ्या हातात असलेतर मी ते जरुर करीन, विक्रमाने विचारले.

पण वेताळ काहीच बोलला नाही , दर्दभऱ्या नजरेने आपल्या वडाच्या झाडाकडे, आपण लटकत असलेल्या फांदीकडे केवीलवाण्या नजरेने एकटक पहात राहीला, शेवटी ही झाडे विक्रमाने, त्याच्या पुर्वजांनी लावलेली आहेत ते तो कसे विसरु शकत होता ?

विक्रमा, चल तुला मी प्रश्न विचारतोच. मी भुमीपुत्र, स्थानीक, मराठी आहे आणि वर मुंबईत रहातो हा माझा गुन्हा आहे का रे ? आम्ही मांसाहार करतो ती आमची जीवनपद्धत आहे. म्हणुन काय आम्हाला आमच्याकडे घरे विकत घेण्यासाठी पैसा असुन सुद्धा बिल्डरनी घरे विकू नयेत का रे ? परप्रांतीयानी आम्हाला केवळ आम्ही मांसाहारी आहेत म्हणुन आमच्या राहात्या जागेतुनही हुसकवुन लावावे काय रे ? दुर्देवाची गोष्ट म्हणजे काही बिल्डर तर आमचेच भाऊबंद आहेत रे ! आमच्यातल्या शाकाहारी माणसांना आम्ही शाकाहारी आहोत , शाकाहारी आहोत हे दुनीयेला ओरडुन सांगायला लागण्याची, अमराठी लोकांना पटवुन देण्याची वेळ का बरे आली रे ?
आमचा कोणीच वाली नाही का रे ? विक्रमा, अधिक माहीती साठी दि. ९ मे रोजी महाराष्ट टाईम्स मधे आलेला श्री. संजीब साबडे यांचा " शाकाहारी वस्त्यांतील घरं महाग " या विषयावर लिहलेला लेख वाच, आजच्या म.टा . मधले "शाकाहारी वस्तांना मराठी शाकाहारीही नको आहेत " हे श्री.अरुण जोशी , गिरगाव यांचे पत्र वाच.

विक्रमा आता समाज त्यांच्या आहारशैलीवर विभागाला जावु लागला आहे रे ! काहीतरी कर रे , आता तुच आमचा वाली ,आमचा तारणहार, तुच आमचा नेता.

वेताळा, मी तुला याबाबतीत काहीच मदत करु शकत नाहीरे, मला पुढच्या शंभर पिढ्यांची तरतुत करुन ठेवायची आहे, शेवटी पैसा हेच जीवनसर्वस्व, हाच सखा, हाच आप्त, आणि हाच शाश्वत. बाकी सारे झुठ. तु गावाकडे किंवा लांब उपनगरात दुसरे झाड बघ. हवेतर त्यास मी तुला सहायता करीन.

विक्रमा तु बोललास, पण हा मी असा उडुन जावु कुठे रे ?

आणि शेवटी अगतीक वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, दोन दिवसात फांदी खाली करण्यासाठी.

- हरे कृष्णाजी

Wednesday, June 13, 2007

तो सुबहाका आलम क्‍या होगा...!

गोष्ट गेल्या वर्षीची आहे. तरीही अजून आठवणीत राहिलेली. तेव्हा मी गोव्यात राहात होतो. गोवा-बेळगाव फेरीही अधूनमधून व्हायची. तसा नेहमी मी तिळारी घाटातून जातो, वेळेची बचत हेच कारण असतं त्यामागं. पण त्यावेळी पोहोचायची फारशी घाई नव्हती म्हणून अंबोली घाटातून जायचं ठरलं. ठरलं म्हणजे मी आणि माझा मित्र निघालो होतो बाईकवरून. नेहमी तिळारीमार्गे जात असलो तरी माझा आवडता घाट अंबोलीच, कायम स्वप्नवत वाटणारा! बरेच रस्ते आणि घाट आपण नेहमी जातो म्हणून ओळखीचे असतात. अंबोलीचं तसं नाही. तो घाट आपल्याला दरवेळी वेगळा दिसतो, भासतो आणि जाणवतो. त्या दिवशी तर घाटात फारसं कोणी नव्हतंही. आम्ही अंबोलीला पोहोचेपर्यंत फारतर पाचसात वाहनं गेली असतील.
घाटाच्या मध्यावर आल्यावर आमच्यावर पावसानंही कृपा केली. आधीच हा घाट थंडगार. मी त्याला एसी घाट म्हणतो. त्यात पावसाची हलकी सर पडून गेल्यावर तर विचारायलाच नको! खरोखरच रोमॅंटिक माहोल होता तो. अशावेळी सोबतीला मित्र नको, बायको हवी असं वाटत होतं खरं! पण काय करणार काही गोष्टींना पर्याय नसतो. छानसा घाट, पावसाचा शिडकावा, आजूबाजूची गर्द झाडी आणि माकडं हे सारंसारं अनुभवत आम्ही पुढे जात होतो. काही वाटा संपूच नयेत असं वाटतं त्यातलीच ही एक वाट. यथावकाश बेळगावला पोहोचलो. कामं आटोपली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
खरंतर येतानाही आम्हाला आंबोलीमार्गेच यावंसं वाटत होतं. पण उशीरही झाला होता. म्हणून नाईलाजानं तिलारी घाटातून यायचं ठरवलं. मघाशीच सांगितलं तसं हा घाट मला फारसा आवडत नाही. एकतर तो अवघडही आहे आणि आजपर्यंत केवळ जवळचा रस्ता, अशीच त्याची माझ्या मनातली प्रतिमा आहे. त्या मार्गानं जाणाऱ्यांना बेळगावकडून येतानाचा सुरवातीचा रस्ता नक्कीच डोळ्यासमोर येईल. आधीच मातीचा रस्ता, त्यात पाऊस पडलेला, मग काही विचारायलाच नको! (आधीच मर्कट तशात...) कसंबसं आम्ही तेवढा तो दहा मिनिटांचा पॅच अर्ध्या तासात पार केला. पुढं गेलं की तिथे तिळारी वीज घराची कर्मचारी वसाहत आहे. तिथनं मात्र या रस्त्याचा नूरच बदलला...! हा सारा रस्ता संध्याकाळी सहा वाजता चक्क धुक्‍याची छानशी दुलई ओढून बसला होता. या धुक्‍यानं आम्हाला अगदी शेवटपर्यंत साथ केली. घाटाच्या पायथ्याशी दुकानं आहेत. तीसुद्धा धुक्‍यातच लपली होती. अशावेळी चहा घ्यायलाच हवा, आवश्‍यकच असतो तो. दाट धुक्‍यात चहा पिण्याचा आनंद काय होता ते सांगताही येत नाही आणि त्याची कशाशी तुलनाही करता येत नाही!
पुढे तर या घाटानं माझ्यावर मोहिनीच घातली. तो "केवळ जवळचा' रस्ता इतका वेगळाही असू शकतो, हे काही काळ पटतच नव्हतं. माझा मित्र तिथनं नेहमी जाणारा. त्यानं एके ठिकाणी गाडी थांबवली. मला म्हटला हळूहळू पुढे जा, आणि मजा बघ... छानसं गवत पसरलेलं होतं. त्यावर पिवळी पिवळी फुलं फुललेली होती... अर्थात धुक्‍यानं साथ सोडलेली नव्हती. अगदी काही पावलं पुढं सरकलो असेल तर समोर अथांग दरी पसरलेली! निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण करतो, म्हणजे नक्की काय करतो ते तिथं अनुभवायला मिळालं. ते सौंदर्य अनुभवायला आकाशस्थित ढगही दरीत उतरले होते. हो... मी खाली वाकून ढगही पाहात होतो...
आपल्याला आनंदही चढतो, त्याचीही धुंदी असते याची जाणीव पहिल्यांदा झाली. पुढचा सगळा रस्ता असाच होता. आम्ही ढगातून जसजसा घाट उतरत होतो तसतसे मुके होत गेलो. न जाणो एखादा शब्द बोलायचो आणि ढग दूर जायचे, असंच वाटत राहिलं. काहीवेळा मुकं राहणंच जास्त आनंद देतं, नाही का? अर्थात निसर्गाची ही भव्य नजाकत आणि सौंदर्याचा अनुभव घेताना वेळ कमी पडत होता. मग बोलून वेळ घालवणार कोण? खरंच खूप छान अनुभव होता तो. आपण उगाचच एखाद्याला कानफाट्या म्हणत असतो... मला आज समजतंय, प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाचा मूड असतो... आपण या गोष्टी लक्षातन घेता लेबल चिकटवून मोकळे होतो. हा घाट अनुभवावासा मला कधीच वाटला नव्हता, आता पुन्हा त्याच रस्त्यानं जायला निश्‍चित आवडेल.
घाट संपला आणि आम्ही पुन्हा नेहमीच्या रस्त्याला लागलो. घाटात असताना काही बोलावंसं वाटत नव्हतं खरं, पण एक ओळ मात्र पुन्हा पुन्हा डोक्‍यात घोळत होती, "जब रात है ऐसी मतवाली, तो सुबहा का आलम क्‍या होगा!' आता पुन्हा मी त्याच रस्त्यानं जाणार आहे, पण "सुबहा का आलम' अनुभवायला...!

- अभिजित थिटे

Tuesday, June 12, 2007

प्रिय मैत्रीण,

खूपच कालावधीनंतर तुला पुन्हा पत्र पाठवत आहे. कारणंही तशीच आहेत. निमंत्रणाच्या यादीत माझ्या जीवनात आलेल्या त्या "प्रथम स्त्री'नं तुझं नाव सुचवलं आहे.
तुला कल्पना आहेच, आपल्या काळात मागे-पुढे किती गोतावळा असायचा. मित्र-मैत्रिणीतील गुपितं क्षणात गावभर व्हायची. नात्यागोत्याचा केवढा धाक असायचा. आपल्यापैकी किती मित्र-मैत्रिणी किंवा सखे-सोबती पुढे नात्यांचे संबंध जोपासण्यात यशस्वी झाले? आपल्यापैकी कोणा तरी एकाला लवकरात लवकर चतुर्भुज करण्यात पालकांना किंवा नातेवाइकांना धन्यता वाटायची. खरंच का ती एवढी खाष्ट असायची? आपल्यातील आकर्षण, स्नेह आणि प्रेम भावना त्यांना समजत नव्हत्या का? का त्यांचा "इगो हर्ट' होत होता?
त्या काळीही आपण मैत्रीचे संकेत, संवाद, गाठीभेटी, फेरफटके अशी मजा करायचोच. वह्या-पुस्तकांची देवाणघेवाण, पानांवरील खुणा, चित्रं, वेलबुट्टी आणि अधोरेखन (अंडरलाईन) या साऱ्याच्या साह्यानं आपण विचारांचे आदान-प्रदान करायचोच. क्‍लास, शाळा, कॉलेज कॅन्टीन, कट्टे इथं संपर्क साधायचोच. फार लांब नाही तरी खिडकी, गल्ली, आडरस्ते, कॅनॉल रोड, मंडई, देवदर्शन या मार्गे चुटपुट भेटी होतच असत. काही धाडसी मंडळी या पलीकडे जाऊन क्वचित नाटक वा सिनेमागृहांमध्ये फिरायला जात. खूपच दूर म्हणजे विद्यापीठाच्या मागं किंवा तळ्यापर्यंतही फिरण्याची मजल जात होती. हे सगळं असूनही वहीच्या पानावर, बागेतील झाडावर, कॉलेज इमारतीच्या किंवा टेकडीवरच्या दगडावर किंवा किनाऱ्याच्या वाळूवर हृदयात शिरलेल्या बाणाच्या चित्रात दोघांची नावं शेजारी शेजारी लिहिण्यापलीकडं आपल्यातील नातं जाऊच शकत नव्हतं. त्या काळी तीही एक अद्वितीय घटना होती. या सीमेवर व पलीकडं नात्यागोत्यातल्या मंडळींचा कडक पहारा असे. या सीमेपलीकडं पाहणं किंवा विचार करणं याचीही बंदी असे.
अरे हो, सांगायचं राहूनच जातंय. माझ्या जीवनात "नाते दरवाजानं' शिरलेल्या त्या "प्रथम स्त्री'नं आजपर्यंत बराच गोतावळा जमवला आहे. माझ्या आईनंतर, माझ्या पोटात शिरून तिनं आता माझं मनही काबीज केलं आहे. या सर्वात लेक-लेकी, सुना-जावई या पाठोपाठ नात-नातूही सहभागी आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणींपैकी कोण कोण तुझ्या संपर्कात आहेत? या निमित्तानं त्यांनाही माझ्या आमंत्रणाचा निरोप दे.
खरंच हळूहळू का होईना, पण काळ पालटला.
आजकालच्या मित्रमैत्रिणी कॅन्टीन कट्ट्यावर नाही, तर कॉफी शॉपवर गप्पा मारतात. वह्या-पुस्तकांच्या पानांवरील खाणाखुणा, चित्रं, मजकुरापेक्षा एसएमएस, ई मेल, ब्लॉगवर आपली मनं मोकळी करतात. आपल्या काळातील गाठीभेटींची संकेतस्थळं रस्तारुंदीत गेली आहेत. कॉम्प्युटरवर नवीन संकेतस्थळं निर्माण होत आहेत. फेरफटक्‍याच्या मोकळ्या जागी श्‍वास दडपणारी गर्दी असते. मोकळ्या फिरण्याच्या जागी इमारती आणि पुलांचं जंगल वाढलं आहे. पूर्वीच्या भेळ-मिसळीची जागा वडापाव आणि कच्छी दाबेलीने घेतली आहे. आपल्या वेळचे थर्मास आता अडगळीत गेलेत. सध्या एक बरं आहे. बाईकवर जाताना काहीही नेणं-आणणं खूप सोपं जातं.
असो, कालाय तस्मै नम:
पत्र संपतंय, तरी मूळ निरोप लिहायचा राहूनच जातोय. माझ्या जीवनात आलेल्या त्या "प्रथम स्त्री'नं आमच्या लग्नाच्या "डायमंड ज्युबिली'च्या कार्यक्रमात माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना अग्रक्रम दिलाय. तेव्हा येत्या रविवारी नक्की यायचं.
तुझा मित्र

- अविनाश लिमये

Monday, June 11, 2007

हताश झालेले सर्व रस्ते...

हताश झालेले सर्व रस्ते...
प्रारंभासकट अंताचे संदर्भ
गमावून बसलेले ठसे,
थरकापत्या रक्ताची असह्य वळणे...
किती धावायचे आपण अजून?
एकेक दिशा हतबल...
उभ्या जन्माचे चकवे
पायांशी घुटमळणारे...
अराजकाची निस्पंद चाहूल
आतल्या आत डुचमळणारी...
किती धावायचे आपण अजून?

रस्त्याच्या मधोमध
दिशाहीनतेचा वारसा अंगावर पांघरून
उभी आपली पिढी
रोजच्या अज्ञात अपघाताची
वाट पाहत बेफिकीर.

धुळकटल्या नजरेत घोंघावणारी
अस्पृश्य क्षितीजे.
हताश झालेले सर्व रस्ते...
मयूर लंकेश्वर -पूणे

Sunday, June 10, 2007

प्रश्न....?

फलाटावर नादे बोलकी शांतता
रूळावरून गाडी कुठे गेली

निःशब्द लेखणी पोरकी पुस्तके
भरलेली वही कुठे गेली

लपून बसण्या अ।भाळ पुरेना
अभंगांची ताटी कुठे गेली

करतो साजरा असण्याचा सोहळा
जगण्याची हातोटी कुठे गेली

अभिषेक अनिल वाघमारे

Friday, June 8, 2007

निबंद - पावूस!

पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. रिमजिम पडती श्रावण गारा हे गाणे आतिशय रोमहर्षक आहे. आमचा रेडियो बिघडला आहे त्यामुळे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.

पाउसाची सुरुवात रोमहर्षक असते. आधी कडाक्‍याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे. अशी नेमी बातमी असते (दडी हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे)

भारतात पाउस अंदनान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर "काका' आणि इतर काळी "तात्या विनचू' म्हणतो तसेच दोन सन्मानार्थी शबद आहेत ते.)

काल पुण्याच्या शहरात पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिंदे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.

काल पावसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी त्या जमवून माठात टाकल्या. ते कुठहिलि फुकट गोशट वाया घालवत नाहीत.

अंत्या अतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. छतरी उलटी करून गारा वेचल्याने ती फाटली.

असा हा रोमहर्शक रुतु मला आतिशयच आवडतो.

- आयशॉट उरफ राफा (सहावी ड)

Thursday, June 7, 2007

नाना रूपात "तू'...

घरात असतेच तेव्हा गृहलक्ष्मी असतेस
बाहेर पडताना स्वप्नपक्षी असतेस
बॅंकेत तू लक्ष्मी बनतेस
अभ्यास घेताना गृहिणी होतेस
पहूडताना स्वामिनी बनतेस
उठवताना चेतना बनतेस
थोपटताना आई बनतेस
वाढताना अन्नपूर्णा दिसतेस
भांडताना रागिणी होतेस
रुसताना "भामिनी' दिसतेस
कंबर कसून उभी ठाकते
आधण ठेऊन चहा टाकते
तांदूळ भिजवून कुकर लावते
भाजी चिरून फोडणी करते
डबा करून, डबा भरते
गाडी घेऊन ऑफिस गाठते
घरी येताच गृहिणी बनते
स्वयंपाकाची तयारी करते
सर्वांना सांभाळून अभ्यास घेतेस
गुणांवर लक्ष ठेवते
पाहुण्यांना चहा देते
ज्येष्ठांना मान देते
रात्री थोडा विचार करते
उद्याची तेव्हाही काळजी करते...

- सुभाष इनामदार

Tuesday, June 5, 2007

घोळ झालाय च्यायला डोक्यात खूप घोळ झालाय

ऑफिस मध्ये काय करतो मला माहित नसते
घरामधे बायको काय बोलते मला माहित नसते
कुठल्या दिवशी कुणाचा वाढ़ दिवस असतो वगैरे सोडाच
च्यायला कुठल्या दिवशी माझा वाढ़ दिवस असतो ते पण मला माहित नसते

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप .... जाऊ दे

मित्रान्ना फ़ोन करायला मी विसरातो
ऑफिस मध्ये मीटिंग ला जायचे मी विसरतो
मीटिंग रूम्स ची नावे पण भारी "नर्मदा ",सिंधु असते कुठली तर कुठली असते गोदावरी
कुठली फर्स्ट floor वर अणि कुठली सेकन्ड वर हे पण मी विसरतो

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप घोळ झालाय

सॉफ्ट वेअर मध्ये काम करून साली माझी एफ्फिशियंसी पण गेलिये
काहीही वेळेवर आणि चांगलं करायची इच्छा पण मेलिये
फक्त पैसा कमावयाचे मात्र छान जमले आहे
बाकी नितिमत्ता सगळी तेल लावत गेलिये
माझ्या कामाचा जगाला किती उपयोग होतो ते नाही माहित
पण बिल्डर्स अणि दुकान्दारांची मात्र चांदी झालिये
हे सगळं पाहून ....
घोळ झालाय माझ्या डोक्यात ....साला फार घोळ झालाय

एक ना दोन ....हज़ार विचार येतात
flat,गाडी ,नोकरी ,लग्न बायको,नातेवाईक ,मराठी बाणा,गाणे म्हणा ,पुण्याच्या ट्रिपा ,ट्रेन तिकिट्स ,US ला जायचय ,अजुन छापायचय,वजन वाढलय ते सम्भाळायचय....
एक ना दोन हज़ार विचार येतात
दिवसाचे २४ तास त्यामुळे कमी पडतात .... काय काय करु ?
घोळ झालाय खरच घोळ झालाय

कधी कधी वाटत मेडिटेशन करावं
डोक्याला थोड़ शांत करुन त्याला ताळ्यावर आणावं
निसर्गाने इतकं डोकं दिलय ते कसं शांत असावं
प्रत्येक गोष्टिचं गणित डोक्यात फीट बसावं
पण मेडिटेशन चा हा विचार लक्षात च रहात नाही
कारण ....
डोक्यात घोळ झालाय ... इतका घोळ झालाय कि अजुन आठवत नाही काय काय घोळ झालाय
घोळ झालाय ,डोक्यात , लाइफ मध्ये ,इकडे तिकडे सगळीकडे नुस्ता घोळ झालाय

आदित्य नारायणन

शांत झोपेची कहाणी

मायानगरीतील ती दमट दुपार होती. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर रोज एवढीच वर्दळ होती.मी
गाडीत बसुन भोवतालचे निरीक्षण
करण्यात मग्न होतो. एवढे लोक कुठुन येतात,मुंबईत कसे राहतात हे एरव्ही मुख्यमंत्र्यांपासुन अनेक
थोर विचारवंतांना पडणारे
प्रश्न माझ्या समोरही उगीच येत होते. गाडी सुटायला अजुन पंधरा मिनिटे होती. माझे माझ्या
प्रश्नांची खेळणे चालु होते. उकाडा
फार असल्या कारणाने जो तो पाणी किंवा थंड पेये घेत होता.

इतका वेळ दुर असणारी माझी नजर जवळच बाकड्यावर आडव्या पडलेल्या माणसाकडे गेली. अंगाने
सडपातळ ,सावळा वर्ण असलेला
तो माणुस एवढ्या गर्दीतही शांतपणे बाकड्यावर झोपला होता. अंगात काळसर बनियन,करड्या
रंगाची विजार,डोळ्यांवर जाड भिंगाचा
चष्मा असा त्याचा साधा पोशाख होता. आजुबाजूला चाललेल्या वर्दळीकडे त्याचे बिलकुल लक्ष
नव्हते, झोपेतही त्या वातावरणाबद्दलची
त्याची बेफिकीरी दिसुन येत होती. तो शांतपणे निद्रेच्या आधीन झाला होता. गाड्यांच्या
आवाजाने,दमट हवामानाने,घामांच्या धारांनी
त्याची झोप मुळीच मोडत नव्हती. त्याच्या या समाधानी वृत्तीचे मला खरेचं आश्चर्य वाटत होते.
त्याने उशाला कसलीतरी पिशवी घेतली
होती. गाडीने एक जोरदार शिट्टी दिली आणि गाडी सुटली. त्या आवाजानेही तो उठला नाही.
मी खिडकीतुन मागे वळुन पाहिले तेव्हाही
तो बापडा तसाच झोपला होता.
झोप कशी असावी याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तो माणुस होता. मला त्याच्या झोपेचे रहस्य
जाणुन घ्यायचे आहे.
त्याचा तो शांत चेहरा, ती शांत झोप अजुनही माझ्या लक्षात आहे.

लेखक:- श्रीराम समर्थ
निमित्त:-महेश अवसरे

Sunday, June 3, 2007

कट्टा

"भावा, ते किंटन लई बेरकी...तुला सांगतो...' असं करत गजानं तोंड उघडलं, की भली भली, चकचकी गॉसिप्स्‌ मॅगेझिन्स झक मारावीत, असे मसालेदार किस्से सुरू व्हायचे..."येकदा ती मोन्का, अशी हुबी होती...' असं करत गजा जणू व्हाईट हाऊसच्या ऍन्टी चेंबरमध्ये घुसून सारं पाहून आल्यासारखा गुऱ्हाळ सुरू करणार. क्‍लिंटनपासून सुरू झालेलं गजाचं पुराण कुठंही अनिर्बंध संचारणार. मग, त्यात सचिनची बायको त्याच्यापेक्षा नेमकी किती वर्षांनी मोठी, त्याचे फायदे काय-तोटे काय, शाहू स्टेडियममधल्या फुटबॉल मॅचमध्ये कसं फिक्‍सिंग झालं, नगरसेवकानं गटारीच्या कामात किती पैसे खाल्ले...असे एक ना अनेक किस्से गजाच्या पोतडीतून निघत राहणार आणि घरातून "संपला की नाही तुमचा कट्टा ?' अशी तिरसट हाक आली, की साऱ्यांना हळू हळू भान येणार...!

आमचा कट्टा म्हणजे आमचं सारं काही. अगदी गळ्याशप्पथ. "इस घर की हर ईंट मैने अपने खून-पसिनेंसे लगायी है...' हा डायलॉग आमचं आणि कट्ट्याचं नातं सांगण्यासाठीच बहुधा लिहिला गेला. खरंच, आम्ही कट्ट्यासाठी खून-पसिना एक केला. म्हणजे काय झालं, की गल्लीच्या कॉर्नरला आम्ही सगळे नेहमीच उभे असायचो. येणाऱ्या-जाणाऱ्यांकडं गरजेनुसार पाहात असायचो. पण, तास-दोन तासांनी पाय दुखायचे. मग, तिथंच रस्त्याकडेला बसायचो. बरीच वर्ष अशी-तशीच गेली. साताठ वर्षांमागं, कधीतरी अचानक सुचलं, की इथंच बसायची सोय केली तर काय जातंय ? "विचार आणि कृती, त्यातील अंतर' वगैरे गोष्टी त्यावेळी कानावरूनही गेल्या नव्हत्या. त्यामुळं, सुचला विचार, केलं काम. झाला कट्टा...! शेजारच्या गल्ल्या पालथ्या घातल्या. त्यातल्या त्यात दूरची गल्ली पकडली. तिथं सुरू असलेली बांधकामं हेरून ठेवली अन्‌ रात्रीत आमच्या गल्लीचा कॉर्नर कट्ट्यानं सजला...!
बसायची सोय झाली. चांगला फरशीचा कट्टा झाला. हा, चार-दोन ठिकाणी आवई उठली, की पोरं चोरटी आहेत. इथं कट्ट्यावर येऊन तसं म्हणायची कुणाची बिशाद झाली नाही, हे आमच्या कट्ट्याचं यश...! कट्टा बांधला, म्हणून पार्टी केली. स्टेरिओ लावून नाचलो. एरव्ही तास-दोन तास कॉर्नरला वेळ काढणार, ते आता रात्री उशीरापर्यंत बसू लागलो. नाहीतरी अस्थिरता घातकच की. उभे राहून राहून तुम्ही किती वेळ उभे राहणार ? बसायला हवंय. त्याशिवाय स्थिरता येणार ? तर अशी स्थिरता आम्हाला आली. मग गप्पांचे फड मारू लागलो.
मघाशी म्हटलं, तो गजा म्हणजे आमच्या कट्टा शिरोमणींपैकी एक. अशा नवरत्नांची खाण कट्ट्यानं घडवलीय.
घरातल्यांची भुरटी कामं आटोपली, की सकाळचा कट्टा फड जमतो. पेपर वाचला असला, तर कोणीतरी पेपरातला काहीबाही सांगत सुटतो. क्रिकेटची मॅच आदल्या दिवशी झालेली असली, तर सकाळचा फड क्रिकेटवर. पेपरबहाद्दर सुज्या "द्रविडनं ऑफ स्टंपचा बॉल लाईनमध्ये येऊन नीट खेळला पाहिजे' असं कुणाच्या तरी कॉलममधलं वाक्‍य आमच्या तोंडावर फेकणार. आता आम्हाला एक "लाईन' माहिती ! त्यामुळं आम्ही मान डोलवणार. क्रिकेटचा कंटाळा आला, की "ऍश', "कॅटरिना', शेजारच्या गल्लीतल्या भानगडी. भुकेनं पोटात कलकलायला लागलं, की एक एक जण हळू हळू कट्ट्यावरून घरंगळत घरची वाट धरणार. अडिच-तीनपर्यंत कट्टा पार ओकाबोका. किंवा मग हीच त्याची विश्रांतीची वेळ. "ऍश'चा ताजा विषय डोक्‍यात ठेवून दुपारची डुलकी काढून पुन्हा कट्टा ताजातवाना. दिवस कलंडण्यापूर्वीच त्याचे सारे वारकरी नेमानं हजर.
संध्याकाळी कुठं फिरायला जायचं असलं, तर तेही ठरणार इथंच. परत किती वाजता याचचं ? रात्रीचा काय "कार्यक्रम'? "ती' घरच्यांबरोबरच फिरायला गेली आहे का, याची खात्री करायला पाहिजे का? असं सगळं प्लॅनिंग इथंच. कट्ट्यावरच असलो तर विषय कोणताही चालणार. घरातल्या बायकांमुळं टीव्ही बघणं अलीकडं कसं अवघड होतंय, यावर साऱ्यांचं एकमत. "सॉंस-बहूँ', "अवंतिका' असली रड आपण कधीच न पाहिल्याचा साऱ्यांना अभिमान. तो प्रत्येकजण दाखवणार.
इथं शाळा-कॉलेजचा विषय फक्त "मापं' घेण्यापुरता किंवा मास्तरची आई-बहिण काढण्यापुरता. तिथल्या इतर गोष्टींची इथं काहीच जरुरी नाही, हे कट्टेकऱ्यांना मनापासून पटलेलं. गजानं दहावीच्या आसपास शाळा सोडलेली. त्याच्याकडची माहिती मात्र आमच्यातल्या "इंजिनर्स'ना लाजवणारी. आणि असे गजा कट्ट्यावर दिवस न रात्र पडून. त्यामुळं शाळा-कॉलेजातल्या उंच उडीचा कट्ट्याशी संबंध शून्य. इथं बसायचं, तर कट्ट्यावर येऊन. उगाच हुशारीच्या शिडावर बसून खालच्यांना हिणवायचं नाही. कोण कधी शिडाला टाचणी लावंल, सांगता येणार नाही.
कट्ट्याला विषयाचं वावडं नाही. इथं सेन्सॉरशीप नाही. जसा विचार, तशी भाषा. मनातलं काही दडवायचं नाही. बोलून टाकायचं, हा कट्ट्याचा खाक्‍या. त्यामुळं रात्रीची जेवणं उरकून कट्टा रंगला, की बास. गजा सुटला, तर किशाला टॉनिक. किशा झाला, की अरव्या. "माहितीचा अधिकार' कायदा नसतानाही, यांनी असली माहिती कुठून, कशी मिळवली, याचं राहून राहून आश्‍चर्य वाटणार. कट्टा रंग रंग रंगाणार. डोक्‍यावरचा सूर्य पाहिलेल्या कट्ट्याला चंद्रही डोक्‍यावर आलेला पहायला मिळणार. घरातल्यांची हाक एकीकडं आणि गजाचं "तुला सांगतो...'दुसरीकडं, अशा त्रांगडं झालेल्या अवस्थेत कट्ट्याचा प्रत्येक वारकरी झोप आवरत ताटकळणार...

- सम्राट फडणीस

Friday, June 1, 2007

अबोला

काल भांडण झालं घरात. कारण किरकोळच. पण भांडण झालं खरं... कसं झालं, का झालं, कोणाची चूक होती याला काही अर्थ नाही... पण खरं सांगू, अगदी मनातलं? मजा आली. नेहमीचं तेच तेच जगण्याला असं काही झालं की अर्थ येतो. नाहीतर तीच बायको आणि तोच नवरा...
हो भांडण आमचं नवरा-बायकोचं झालं. तसं फार काही जगावेगळं घडलं नाही. चारचौघांमध्ये घडतं तसंच... चूक तिची का माझी... हा तर मोठ्या संशोधनाचा विषय आहे. आपण विनाकारण भांडलो नाही तर जगाचं पुढे चालायचं कसं...?
लव्हमॅरेज झालेल्यांबाबत काहीतरी वेगळं असेल, त्यांच्या भांडणाला काहीतरी कारण असेल, असं मला उगाचंच वाटत होतं. पण त्या बाजूलाही तीच कथा. न राहवून त्यांच्याकडं चौकशी केली. त्यात वेगळंच निघालं. "तू मला शिकवू नकोस, मी तुला कॉलेजपासून ओळखतेय किंवा ओळखतोय', अशी त्यांच्या भांडणाची सुरवात असते. ऍरेंज मॅरेजमध्ये हे बोलायचा चान्स नसतो. म्हणून त्या बाजूची भांडणं लव्हमॅरेजवाल्यांसारखी दमदार होत नाहीत. लव्हमॅरेजवाल्यांना कसा आधीच्या काही वर्षांचा रेफरन्स असतो, त्या काळात झालेल्या चुका पुन्हा पुन्हा उगाळायला मिळतात (उगाच सांगू नकोस, मला माहितेय त्या फर्स्ट इअरमधल्या ...वर तू आधी लाइन मारत होतास... वगैरे वगैरे) ती व्यवस्था ऍरेंजवाल्यांसाठी नाही.
या झाल्या भांडणाऱ्यांच्या दोन बाजू. पण याहीपेक्षा वेगळ्या बाजू आहेत. पहिलं भांडण नेहमीचं... कडाक्‍याचं. दुसरा प्रकार मात्र फार धोकादायक आहे. तो प्रकार म्हणजे अबोला... अर्थातच पुरुषांसाठी धोकादायक असलेला अबोला... अगदी व. पु. काळ्यांनीही या गोष्टीवर लिहून झालं आहे. अबोला हे बायकांकडचं ब्रह्मास्र आहे. त्यांनी ते उगारलं, की भले भले नवरे चिडीचूप होतात. त्यांचं काहीही चालत नाही. बरं, समजूत काढायला गेलो, की "आता कशाला लाडीगोडी लावताय? आधी कसंही वागायचं, नंतर लाडीगोडी लावायची... तुम्हाला तेवढंच जमतं,' अशी उत्तरं तयार असतात. आता अशा युक्तिवादांपुढे काय डोकं फोडणार? पण हे असंच चालतं म्हणूनच भलेभले गपगार होतात. ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना पटत असेल हे. (लग्न झालेले बहुतेक सगळे हा अनुभव घेतातच) आता हे सारं उगाळायचं कारण लक्षात आलंच असेल. आमच्याकडे अबोलाच होता. देवाच्या दयेने तो लवकर आणि थोडक्‍यात संपला. थोडक्‍यात म्हणजे एक कॅडबरी आणि आइस्क्रीमवर निभावलं. माझ्या शेजाऱ्याला असा अबोला साडी, बाहेर जेवण आणि पाच दिवसांचं माहेरपण एवढ्याला पडला होता...
म्हणूनच मी फार थोडक्‍यावर निभावलो म्हणायचं. सगळेच नशीबवान असतात असं नाही. असतात एकेकाचे भोग... भोगावेच लागतात!

अभिजित थिटे