ऑफिस मध्ये काय करतो मला माहित नसते
घरामधे बायको काय बोलते मला माहित नसते
कुठल्या दिवशी कुणाचा वाढ़ दिवस असतो वगैरे सोडाच
च्यायला कुठल्या दिवशी माझा वाढ़ दिवस असतो ते पण मला माहित नसते
घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप .... जाऊ दे
मित्रान्ना फ़ोन करायला मी विसरातो
ऑफिस मध्ये मीटिंग ला जायचे मी विसरतो
मीटिंग रूम्स ची नावे पण भारी "नर्मदा ",सिंधु असते कुठली तर कुठली असते गोदावरी
कुठली फर्स्ट floor वर अणि कुठली सेकन्ड वर हे पण मी विसरतो
घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप घोळ झालाय
सॉफ्ट वेअर मध्ये काम करून साली माझी एफ्फिशियंसी पण गेलिये
काहीही वेळेवर आणि चांगलं करायची इच्छा पण मेलिये
फक्त पैसा कमावयाचे मात्र छान जमले आहे
बाकी नितिमत्ता सगळी तेल लावत गेलिये
माझ्या कामाचा जगाला किती उपयोग होतो ते नाही माहित
पण बिल्डर्स अणि दुकान्दारांची मात्र चांदी झालिये
हे सगळं पाहून ....
घोळ झालाय माझ्या डोक्यात ....साला फार घोळ झालाय
एक ना दोन ....हज़ार विचार येतात
flat,गाडी ,नोकरी ,लग्न बायको,नातेवाईक ,मराठी बाणा,गाणे म्हणा ,पुण्याच्या ट्रिपा ,ट्रेन तिकिट्स ,US ला जायचय ,अजुन छापायचय,वजन वाढलय ते सम्भाळायचय....
एक ना दोन हज़ार विचार येतात
दिवसाचे २४ तास त्यामुळे कमी पडतात .... काय काय करु ?
घोळ झालाय खरच घोळ झालाय
कधी कधी वाटत मेडिटेशन करावं
डोक्याला थोड़ शांत करुन त्याला ताळ्यावर आणावं
निसर्गाने इतकं डोकं दिलय ते कसं शांत असावं
प्रत्येक गोष्टिचं गणित डोक्यात फीट बसावं
पण मेडिटेशन चा हा विचार लक्षात च रहात नाही
कारण ....
डोक्यात घोळ झालाय ... इतका घोळ झालाय कि अजुन आठवत नाही काय काय घोळ झालाय
घोळ झालाय ,डोक्यात , लाइफ मध्ये ,इकडे तिकडे सगळीकडे नुस्ता घोळ झालाय
आदित्य नारायणन
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
अभिजित -
हे सही लिहिलंय हे आदित्य ला कसं कळवणार?
तुझा त्याचा संपर्क असेल तर त्याला जरुर सांग कि -
लढ!
अभिजित...
अरे मलाही माहिती नाही. तू इथेच पोस्ट टाक.
आदित्य....
तुझ्या कवितेला मंडळी दाद देत आहेत. त्यांना रिप्लाय दे... इथे दिलास तरी चालेल...
ho ho thanks abhijit 1 and 2.
this is aditya narayan joshi here...
Ladhava tar lagnarch..pan kunashi ani kasa...khup ghol zalay..hahaha
thanks again...
khara ahe re aditya.
Aditya ,
Tumhi chaan lihile aahe. I am wife of a software Pro. and have seen plights of you guys.Good one. Keep it up.
Sumitra (USA)
sahi aare bhidu!1
Post a Comment